शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

व्हायचं होतं आमदार.., मात्र झाला लुटारूंचा टोळीप्रमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 13:11 IST

श्रीमंतांना स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून त्यांचे पैसे लुटणाऱ्या आंतराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने थरारक पाठलाग करून जेरबंद केले. कार्ला फाटा (जि़ पुणे) येथे रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.

अहमदनगर : श्रीमंतांना स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून त्यांचे पैसे लुटणाऱ्या आंतराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने थरारक पाठलाग करून जेरबंद केले. कार्ला फाटा (जि़ पुणे) येथे रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चौघांकडून ८० लाख रुपयांच्या दोन अलिशान कारसह बनावट हिरे, नकली सोन्याचे दागिने व कॉईन जप्त केले आहेत. भीमाभाई गुलशनभाई सोलंकी (वय ४१), हारुण सय्यद अहमद शेख (वय ४३), गणेश हिरा काशिद व संतोष शिवराम गोपाळे (वय ४२, सर्व रा. हल्ली देवगाव, जि. पुणे) अशी चौघांची नावे आहेत. कारवाई दरम्यान दोन जण पसार झाले. सोलंकी हा या टोळीचा प्रमुख आहे. या टोळीने दिल्ली येथील व्यापारी इंद्रकुमार मंगतराम बक्षी यांना स्वस्तात सोन्याचे कॉईन देण्याचे आमिष दाखविले होते. बक्षी यांना पैसे घेऊन ११ मे रोजी शिर्डी जवळील घोटी नाक्याजवळ बोलाविले होते. बक्षी ५० लाख रुपये घेऊन आले, तेव्हा सोलंकी याच्या टोळीतील पंटरांनी बक्षी यांच्यावर हल्ला करून त्यांचे पैसे पळविले होते. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.या गुन्ह्याचा शिर्डी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करत होते. ही टोळी पुणे परिसरात राहत असून, ते कार्ला फाटा येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. माहितीनुसार पथकाने कार्ला फाटा येथे जाऊन कारसह या चौघांना ताब्यात घेतले. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन दोन जण पळून गेले. चौघांना पुढील कारवाईसाठी शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.फसवणूक झालेल्या नागरिकांनी संपर्क करावासोलंकी टोळीने स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणू केली आहे. यातील बहुतांशी जणांनी मात्र पोलिसांत तक्रार दिलेली नाही. ज्यांची फसवणूक झाली त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा अथवा शिर्डी पोलिसांशी सपंर्क करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.आधी आमिष नंतर लूटसोलंकी हा आधी श्रीमंत लोकांची माहिती काढत होता. त्यांच्याशी संपर्क करून ओळख निर्माण करत असे. त्यानंतर आम्हाला खोदकाम करताना सोन्याचे नाणे सापडले आहेत, असे सांगत असे. समोरच्या व्यक्तीचा विश्वास बसावा, यासाठी तो खरे सोन्याचे काही नाणे त्यांना देत असे. त्यानंतर त्यांच्याशी डील करून तो निर्जन ठिकाणी पैसे घेऊन बोलवित असे. समोरील व्यक्ती पैसे घेऊन आली, की सोलंकी याचे साथीदार त्याच्यावर हल्ला करून पैसे लुटत होते. सोलंकी व त्याच्या टोळीने पुणे, सातारा, ठाणे मुंबई परिसरांत अनेक धनिकांची लूट केल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली आहे. सोलंकी टोळी मात्र आजपर्यंत रडावर आली नव्हती.सोलंकी काँगे्रसचा कार्यकर्ताचोरांच्या टोळीचा प्रमुख भीमाभाई सोलंकी हा एकेकाळी काँग्रेस पक्षाचा राज्यातील वडोदरा शहर विभागाचा उपप्रमुख होता. पक्ष आणि त्याच्या पदाचा उल्लेख असलेले व्हिजिटिंंग कार्ड पोलिसांना त्याच्याकडे आढळून आले आहे. त्याने वडोदरा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूकही लढविली होती, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. तो मूळ राजस्थान येथील आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून वडोदरा येथे स्थायिक झाला होता. सोलंकी गेल्या काही वर्षांपासून त्याच्या साथीदारांसह देवगाव (जि. पुणे) येथे राहत होता़ पुणे शहर व परिसरात त्याची तीन अलिशान घरे व तीन कार आहेत.या टीमने केली कारवाईजिल्हा पोलीस अधीक्षक रंजकुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार, सहायक निरीक्षक कैलास देशमाने, श्रीधर गुठ्ठे, सुधीर पाटील, राजकुमार हिंगोले, हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, कॉन्स्टेबल दत्ता हिंगडे, उमेश खेडकर, मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, रावसाहेब हुसळे, रवींद्र कर्डिले, भागीनाथ पंचमुखी, रविकिरण सोनटक्के, योगेश सातपुते, दत्ता गव्हाणे, मनोज गोसावी, विजय ठोंबरे, मेघराज कोल्हे, बाळासाहेब भोपळे, संभाजी कोतकर

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस