शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

मुळा धरणाचा डावा कालवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 16:55 IST

मुळा धरणाचा डावा कालवा आज बंद करण्यात आला आहे

राहुरी : मुळा धरणाचा डावा कालवा आज बंद करण्यात आला आहे. ६१४ दलघफु पाण्याचा वापर करण्यात आला असून २८०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. रब्बीसाठी सोडण्यात आलेले हे शेवटचे आवर्तन २८ दिवस सुरू होते.मुळा डाव्या खालव्याखाली ऊस, कांदा, हरभरा, गहू व चारा पीके यांच्यासाठी पाण्याचा वापर करण्यात आला़ शेवटचे आवर्तन असल्याने डाव्या कालव्याखाली ऊसाच्या लागवडी झाल्या नाहीत. डाव्या कालव्याच्या पाण्याचा विषय संपल्याने शेतक-यांची भिस्त विहीरींच्या पाण्यावर आहे.  कालव्याच्या वरील भागात सध्या अवर्तनामुळे पाणी उपलब्ध आहे. मात्र पुर्व भागातील विहीरींनी तळ गाठला आहे.डाव्या कालव्याचे आवर्तन संपल्याने विहीरींच्या पाण्यावर पीक वाचविणे हे शेतक-यांपुढे आव्हान आहे़ पुर्व भागातील विहीरींचे पाणी फेबुवारीपर्यंत टिकण्याची शेतक-यांना अपेक्षा आहे़ यंदा डाव्या कालव्याखाली खरीप व रब्बी असे दोन अवर्तन मिळाले आहेत. २८ सहकारी पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून रब्बीच्या पीकांना पाण्याचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. मुळा डाव्या कालव्याखाली असलेला बारागाव नांदुर येथील हवरी ओढयावरील एक बंधारा पाण्याने भरला आहे. भागडा चारीच्या तिनही विद्युुत मोटारी बंद पडल्या़ त्यामुळे बारा दिवस पाण्याचे आवर्तन सुरू राहीले़. त्यामुळे ६० पैकी २० बंधारे पाण्याने भरण्यात आले आहे. शॉर्ट सर्कि टमुळे विद्युुत मोटारी बंद पडल्या होत्या़ गोदावरी जल विद्युुत प्रकल्प संगमनेर यांच्या ताब्यात हे पंपहाऊस आहेत.मुळा धरणाच्या डाव्या कालव्यासाठी मंजुर असलेले पाणी रब्बी आवर्तनसाठी वापरण्यात आले़ २८०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. डाव्या कालव्याचा पाण्याचा कोटा संपला आहे़ डाव्याचे आवर्तन २८ दिवस सुरू होते़.- विकास गायक वाड, शाखा अभियंता मुळा डावा कालवा

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी