शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

अहमदनगर जिल्ह्यातील पानमळे झाले नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:22 IST

‘खईके पान बनारस वाला, खुल जाये बंद अकल का ताला’ या डॉन चित्रपटातील गाण्याने नागवेलींच्या पानांची महती देशभरात पोहोचवली. ...

‘खईके पान बनारस वाला, खुल जाये बंद अकल का ताला’ या डॉन चित्रपटातील गाण्याने नागवेलींच्या पानांची महती देशभरात पोहोचवली. ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’ या बहारदार लावणीने त्यात आणखीच रंगत आणली. मराठी, हिंदी चित्रपटातील गाण्यांतून आणि लावण्यांमधून नागवेलींच्या पानात अक्षरशः गोडवा आणला. पण अगदी पुरातन काळापासून महत्त्व असलेल्या नागवेलींच्या पानाचे मळे आज घडीला सरकार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेवटच्या घटका मोजताहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नागवेलींच्या पानाचे मळे तर अक्षरशः नामशेष झाले आहेत. जिल्ह्यातील संगमनेर, राहाता, श्रीरामपूर तालुक्यात १९९९-२००० सालापर्यंत पानाचे शेकडो पानमळे अस्तित्वात होते. पण वातावरणात बदल झाला. पावसाचे प्रमाण कमी झाले. गारपिटीचा फटका बसू लागला आणि अशा परिस्थितीत सरकार आणि प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने आजघडीला एखाद्या गावात क्वचितच एक-दोन पानमळे शिल्लक राहिले आहेत.

.............

नागवेलीच्या पानाचा मळा उभा करण्यासाठी अथक कष्ट घ्यावे लागतात. वेलींची लागवड करण्याआधी उंच वाढणाऱ्या शेवगा झाडाची लागवड करावी लागते. नंतर पानाच्या वेली लावाव्या लागतात. नंतर नागवेल या झाडांवर चढविली जाते. कमी पाण्यात वेली वाढण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर हमखास करावा लागतो. तारेच्या कंपाऊंड बरोबरच पानवेलींना वादळाचा फटका बसू नये म्हणून जाळ्यादेखील लावाव्या लागतात. अगदी पहिले उत्पन्न हातात येईपर्यंत लाखोंचा खर्च होतो.

.,......

पान खाल्ल्याने शरीराला आवश्यक असणारी कॅल्शियम, प्रोटीन्स, खनिजे, कार्बोहायड्रेट, फायबर, व्हिटॅमिन सी मिळते. अनेकदा पान खाणे ही वाईट सवय समजली जाते. कारण अनेक लोक व्यसन म्हणून पान खातात. त्यामध्ये शरीराला हानिकारक अशा पदार्थांचा समावेश करण्यात येतो. असे केल्याने पानामधील शरीराला आवश्यक असणारी सर्व तत्त्वे नष्ट होतात. त्यामुळे असे न करता त्यामध्ये शरीराला आवश्यक असणाऱ्या पदार्थांचा समावेश करून पान खाणे फायदेशीर ठरते. पान खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी, दातांमध्ये लागलेली कीड, भूक वाढणे त्याचप्रमाणे पचन क्रियादेखील सुरळीत होण्यास मदत होते.

- डॉ. प्रणय रघुवंशी, सहाय्यक प्राध्यापक, प्रवरा मेडिकल ट्रस्ट.

......................

अहमदनगर जिल्ह्यासाठी २५० डप्पा (पाट्या) नागवेलींची पाने लागतात. तीन हजार पानांचा एक डप्पा असतो. एका डप्प्याची किंमत तीनशे रुपयांपासून ते २५०० रुपयांपर्यत असते. कोरोना लाॅकडाऊनपूर्वी जिल्ह्यात दररोज ५०० ते ६०० डप्पे लागत होते. सध्या लाॅकडाऊन सुरू असल्याने श्रीरामपूर येथील नागवेलींच्या पानांचा लिलाव बंद आहे.

-बी. डी. थोरात, पानांचे होलसेल विक्रेते, शिर्डी.