शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

Ahmednagar: जनतेच्या हक्काचे पाणी तातडीने सोडा, सवड मिळेल तेव्हा उद्घाटन करा, बाळासाहेब थोरातांचे खरमरीत पत्र

By शेखर पानसरे | Updated: May 23, 2023 18:49 IST

Balasaheb Thorat: उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील १८२ गावांना वरदान ठरणारे निळवंडे धरण पूर्ण झाले. कालव्यांची कामे अनेक अडचणींवर मात करून पूर्ण केली. मात्र, केवळ श्रेयवादासाठी दुष्काळी जनतेला वेठीस धरले जात आहे.

- शेखर पानसरेसंगमनेर : उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील १८२ गावांना वरदान ठरणारे निळवंडे धरण पूर्ण झाले. कालव्यांची कामे अनेक अडचणींवर मात करून पूर्ण केली. मात्र, केवळ श्रेयवादासाठी दुष्काळी जनतेला वेठीस धरले जात आहे. नवीन कालव्यातून दुष्काळी भागातील जनतेच्या हक्काचे पाणी तातडीने सोडा, सवड मिळेल तेव्हा उद्घाटन करा. असे पत्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे काम महिनाभरात पूर्णत्वाला जाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निळवंडे धरणासह कॅनॉलच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले आहे. असे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावात बुधवारी (दि. १७) आयोजीत कार्यक्रमात सांगितले होते. त्यानंतर आता आमदार थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. दुष्काळी भागाला नजरेसमोर ठेवून निळवंडे धरण आणि कालव्यांचे काम करण्यात आले आहे. सध्या निळवंडे व भंडारदरा धरणातून किमान दहा टीएमसी पाणी आपण दुष्काळी भागाला देऊ शकतो. मात्र, केवळ पंतप्रधान नरेद्र मोदी यांची उद्घाटनासाठी वेळ मिळत नाही म्हणून या हक्काच्या पाण्यापासून दुष्काळी भागातील जनता वंचित राहिलेली आहे.

निळवंडे धरण आणि डाव्या कालव्याचे काम यापूर्वीच पूर्ण झालेले आहे. आपले सरकार आल्यानंतर उजव्या कालव्याचे काम रखडलेले आहे, त्याला अपेक्षित गती मिळताना दिसत नाही. उन्हाळा सुरू झालेला आहे, शिवाय मान्सूनला आता अल निनोचा धोका असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. सरकारलाही या भविष्यकालीन दुष्काळाची तीव्रता माहीत आहे. त्यामुळे दुष्काळी भागाचे हक्काचे दहा टीएमसी पाणी लाभक्षेत्रातील बांधवांना मिळणे अत्यावश्यक आहे. असेही पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातAhmednagarअहमदनगर