शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

दिवाळीपूर्वी थकबाकी द्या

By admin | Updated: October 10, 2016 01:03 IST

शेवगाव : एस. टी. कामगारांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळण्यासाठी शासनात विलीन करावे. ३१ मार्च २०१६ च्या वेतनावर २५ टक्के अंतरिम वाढ लागू करावी

शेवगाव : एस. टी. कामगारांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळण्यासाठी शासनात विलीन करावे. ३१ मार्च २०१६ च्या वेतनावर २५ टक्के अंतरिम वाढ लागू करावी. कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करण्यात यावी, शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व एस. टी. कामगारांचे वेतन यांमधील तफावत दूर करण्यात यावी. ६ टक्के वाढीव महागाईभत्त्याची ७५ टक्के थकबाकी एक रकमी दिवाळीपूर्वी मिळावी. सर्वच एस. टी. कामगारांना १५ हजार रुपये रक्कम दिवाळी भेट म्हणून मिळावी. राज्यातील एस. टी. कामगारांच्या एकमेव मान्यताप्राप्त कामगार संघटनेस मिळणारी आकसपूर्वक व पक्षपाती वागणूक न थांबल्यास, तसेच कामगारांच्या विविध समस्या व प्रश्नांची सोडवणूक समयबद्ध काळात व्हावी, आदी मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी येत्या शुक्रवार रोजी राज्यभर विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन पुकारण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य एस. टी. कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी जाहीर केला.महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचा अहमदनगर विभागाचा विभागीय कामगार मेळावा शेवगाव येथे रविवारी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे, जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, प्रादेशिक सचिव विजय पवार, नाशिक विभागीय अध्यक्ष शिवाजी कडूस, सचिव प्रमोद भालेकर, ज्ञानदेव अकोलकर, कार्याध्यक्ष रजनी साळवे आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या वेळी संघटनेचे जनरल सेक्रेटरी ताटे बोलत होते.१ एप्रिल २०१६ पासून लागू होणाऱ्या वेतनवाढीच्या मागण्यांचा मसुदा संघटनेने एस. टी. प्रशासनाकडे सादर केला आहे. एस. टी. कामगारांना ७ वा वेतन आयोग लागू करावा, जेणेकरून नवीन कामगारांनाही भरीव आर्थिक लाभ मिळतील. कंत्राटीकरण पद्धत रद्द करावी. सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नीस ५०० रुपये भरून वर्षभर मोफत पास मिळावा. कामगार कराराचा १६ महिन्यांचा काही कर्मचाऱ्यांचा राहिलेला फरक ताबडतोब मिळावा. कर्मचाऱ्यांना आजारी बिल मिळण्यासाठी होणारी दिरंगाई दूर व्हावी. शेवगाव आगारातील कामगार वसाहतीचा प्रस्ताव लगेच मंजूर व्हावा. आदी महत्त्वपूर्ण मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी संघर्ष अटळ असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले. शेवगाव आगाराचे अध्यक्ष संजय धनवडे यांनी स्वागत केले. तर सचिव दिलीप लबडे यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले. या वेळी भाऊसाहेब लिंगे, लक्ष्मण लव्हाट, बाजीराव कराड, राजू पठाण, राजेंद्र देवढे, पांडुरंग देशमुख, नवनाथ गर्जे, सुदाम उदागे, मधुकर मोहिते, शिवाजी चव्हाण, दीपक ंिशंदे, शेषराव देशमुख, शरद बडे, गणेश तुतारे, गणेश बर्गे, रामराव वाघ, कृष्णा जाधव, आर. जी. पांडव आदींसह विविध आगारांतील संघटनेचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.