शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एलसीबीने सोडला मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:18 IST

निगडी (पिंपरी-चिंचवड) पोलीस ठाण्यात घावटे याच्यासह चौघांविरोधात २१ डिसेंबर २०२० रोजी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात ...

निगडी (पिंपरी-चिंचवड) पोलीस ठाण्यात घावटे याच्यासह चौघांविरोधात २१ डिसेंबर २०२० रोजी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. या गुन्ह्यातील इतर तीन आरोपींना अटक झालेली आहे. घावटे मात्र घटना घडल्यापासून फरार असून निगडी पोलीस त्याचा चौफेर शोध घेत आहेत. घावटे याच्यावर सुपा, शिरुर, बेलवंडी आदी पोलीस ठाण्यातही खून, दरोडे, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, अपहरण आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांनी बबन घावटे याला ताब्यात घेण्याचे आदेश दिल्यानंतर पथकाने ४ फेब्रुवारी रोजी त्याला श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथून दुपारी अटक केली. घावटे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले. येथे मात्र केवळ चौकशी करून त्याला सोडून देण्यात आले. निगडी पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी नगर पोलिसांनी का सोडला याची आता चर्चा सुरू झाली आहे.

----------------------------------------------------------

निगडी पोलीस ठाण्यात २१ डिसेंबर २०२० रोजी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई झालेली असून यातील बबन घावटे याचा शोध सुरू असल्याचे या गुन्ह्याच्या तपासी अधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

--------------------------------------------------------------------------------------

निगडी येथे गोळीबाराच्या गुन्ह्यातील आरोपींना बबन घावटे याने पिस्तूल पुरविल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. सर्व आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई झालेली असून, आम्ही घावटे याचा शोध घेत आहोत. तो मात्र अद्यापपर्यंत मिळून आलेला नाही.

- गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, निगडी पोलीस स्टेशन

------------------------------------------------------------------------------------------

अतुल उर्फ बबन भाऊसाहेब घावटे याच्यावर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्याला कार्यालयात चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. सध्या तो कोणत्याही गुन्ह्यात वान्टेड (पाहिजे असलेला आरोपी) नसल्याने त्याला समज देऊन सोडून देण्यात आले आहे.

- अनिल कटके, निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर