शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातील कैद्यानं मिळवली कायद्याची पदवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 12:24 IST

कारागृहात शिक्षा भोगत असताना एका कैद्यानं कायद्याची पदवी मिळवली. श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे असलेल्या जिल्हा खुले कारागृहातील कैदी पंकज अभिमन्यू कांबळे याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची कायद्याची पदवी संपादन केली आहे.

विसापूर(अहमदनगर) : कारागृहात शिक्षा भोगत असताना एका कैद्यानं कायद्याची पदवी मिळवली. श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे असलेल्या जिल्हा खुले कारागृहातील कैदी पंकज अभिमन्यू कांबळे याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची कायद्याची पदवी संपादन केली आहे.पंकज कांबळे सोलापूर शहरातील रहीवाशी आहे. त्याने १९९२ मध्ये सोलापुरातील कॉलेज मधून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरकडून वाणिज्य शाखेची पदवी मिळवली. वैवाहिक जीवनात पत्नीने आत्महत्या केली. या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. २००५ पासून येरवडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. परंतु त्याची सुधारलेली वर्तवणुक पाहून त्याला २०१३ पासून विसापूर खुल्या जिल्हा कारागृहात वर्ग करण्यात आले. त्यानंतर विसापूर कारागृहाचे अधीक्षक दत्तात्रय गावडे, तुरुंग अधिकारी बाळकृष्ण जासुद, राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बाह्यस्थ प्रवेश घेतला. कारागृहाचे अधिका-यांनी त्याला अभ्यासासाठी सहकार्य केले. त्याने त्याच्या सजा पूर्ण होण्याचे शेवटच्या टप्प्यात एलएलबीची पदवी संपादन करण्यात यश मिळविले. त्याची जन्मठेपेची शिक्षा पूर्ण होण्यासाठी एक वर्ष बाकी आहे. त्या नंतर वकीलीचा व्यवसाय करणार आसल्याचे पंकज कांबळे याने सांगितले.‘‘कायद्यामुळे मला शिक्षा झाल्यावर कारागृहात आभ्यास करुन एलएलबी पदवी घेण्याचा विचार केला. त्यानुसार कारागृह अधीक्षक दत्तात्रय गावडे, तुरुंग अधिकारी बाळकृष्ण जासुद, राजेंद्र पवार यांनी अभ्यासा करीता सहकार्य केले. त्यामुळे हे यश संपादन करु शकलो. एक वर्षानंतर कारागृहातुन सुटका झाल्यानंतर चांगल्या वकिलाचे मार्गदर्शनाखाली व्यवसाय सुरू करण्याचा विचार आहे.’’ - पंकज कांबळे, बीकॉम एलएलबी कैदी, विसापूर कारागृह.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा