शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राहुरीत तळीरामांवर लाठीचार्ज; तीन दुकानांना ठोकले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 14:44 IST

राहुरी शहरात मंगळवारी (दि.५मे) दुपारी पोलिसांनी तळीरामांवर लाठीचार्ज केल्याने एकच धावपळ उडाली. जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचा भंग केला म्हणून राहुरीचे तहसीलदार एफ.आर. शेख यांनी तीन दुकानांना सील ठोकले.

राहुरी : शहरात मंगळवारी (दि.५ मे) दुपारी पोलिसांनी तळीरामांवर लाठीचार्ज केल्याने एकच धावपळ उडाली. जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचा भंग केला म्हणून राहुरीचे तहसीलदार एफ.आर. शेख यांनी तीन दुकानांना सील ठोकले. त्यामुळे अर्ध्या तासामध्ये दुकाने बंद करण्याची वेळ दुकान मालकांवर आली. दारूची दुकाने सुरू होणार म्हणून तळीरामांनी दुकानांसमोर गर्दी केली होती. मात्र मंगळवारी सकाळी दारूची दुकाने उघडली नाही. फिरत्या जिपवरून दारूची दुकाने उघडू नयेत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. मात्र अचानक दुपारी दारूची दुकाने उघडली. तीनही दुकानांसमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. फिजीकल डिस्टन्सिंगचा सर्वत्र फज्जा उडाला. याची माहिती तहसीलदार एफ.आर.शेख व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना समजली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथील परिस्थिती पाहून तहसीलदार शेख यांनी लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला. त्यानंतर किशोर वाईन्स व सुनील वाइन्स या दोन ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे तळीरामांची एकच धांदल उडाली. क्षणात गर्दी गायब झाली. तहसीलदारांच्या आदेशानुसार किशोर वाईन्स, मोटलानी वाईन सुनील वाईन यांना सील ठोकण्यात आले. बेकायदेशीर दुकान उघडल्याबद्दल तीनही वाईन्स चालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद देशमुख यांनी दिली. 

राहुरी येथील तीन दुकानांना सील करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केले म्हणून संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे राहुरीचे तहसीलदार एफ.आर.शेख यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीcorona virusकोरोना वायरस बातम्या