शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भंडारदरा धरणातून शेतीसाठी शेवटचे आवर्तन सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 13:46 IST

भंडारदरा धरणातून व्हाया निळवंडे धरण लाभक्षेत्रासाठी शेतीचे शेवटचे आवर्तन रविवारी दुपारी बारा वाजता सोडण्यात आले. निळवंडेच्या आवर्तन विमोचकातून १५०० क्यूसेक वेगाने पाणी प्रवरा नदी पात्रात झेपावले आहे.

अकोले : भंडारदरा धरणातून व्हाया निळवंडे धरण लाभक्षेत्रासाठी शेतीचे शेवटचे आवर्तन रविवारी दुपारी बारा वाजता सोडण्यात आले. निळवंडेच्या आवर्तन विमोचकातून १५०० क्यूसेक वेगाने पाणी प्रवरा नदी पात्रात झेपावले आहे. निळवंडे धरणाच्या यांत्रिकी विभागामार्फत सुरू असलेले ‘गेट’च्या दुरुस्तीचे काम सुरू होते म्हणून लाभक्षेत्राला आवर्तनाची प्रतीक्षा करावी लागली.निळवंडे धरणातून १५०० क्यूसेकने शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले असून, उन्हाळ्याचे हे तिसरे आणि शेवटचे शेती आवर्तन आहे. आतापर्यंत खरिपासाठी १, रब्बीचे २, उन्हाळ्याचे २ आणि प्रवरा नदीतील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी १ असे एकूण सहा आवर्तने देण्यात आलेली आहेत.शेतीचे हे आवर्तन साधारण २६ ते २८ दिवस सुरू राहील. अंदाजे ३ टीएमसी पाण्याचा वापर होईल, असे जलसंपदाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले. भंडारदरा धरणातून एक दिवस अगोदर शनिवारी १६०० क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे. सध्या भंडारदरा धरणात ३३२६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. निळवंडे धरणात ६१७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. यांत्रिकी विभागामार्फत निळवंडेच्या गेटचे काम सुरू होते म्हणून आवर्तन सोडण्यास उशीर झाला आहे. प्रवरा नदी पात्रातून आवर्तन सुरू झाल्याने लाभक्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.दरम्यान आवर्तन सोडण्यासाठी वापरात येणाऱ्या एका विमोचक गेटच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. दुसºया गेटच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले