अहमदनगर : गुरुवारी २४ आॅगस्ट रोजी पुण्यातील साखर संकुल येथे सहकार मंत्री सुभाष देशमुख, सहकार खात्याचे आयुक्त व पतसंस्था संघटनेचे पदाधिकारी यांच्या समवेत पतसंस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी अंतिम बैठक होणार आहे. बैठकित पतसंस्थांच्या प्रश्नांबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतले जाणार असून अंमल बजावणीबाबत सूचना केल्या जाणार असल्याचीमाहिती सहकारी पतसंस्था आंदोलनाचे निमंत्रक वसंत लोढा यांनी दिली.सहकारी पतसंस्थांचे प्रलंबित प्रश्न सुटावेत, समस्यांचे निराकरण करण्यासाठी नगरमध्ये सहकारी पतसंस्था आंदोलनाची स्थापना करुन जिल्हास्तरीय पतसंस्था बंदचेही आयोजन करण्यात आले होते. सहकारी पतसंस्थांच्या या आंदोलनाची दखल सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी घेतली.त्यानी स्थैर्य निधी सहकारी संघाच्या पदाधिका-यांसमवेत पुण्यात प्रथमिक बोलणीही केली. पतसंस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. पतसंस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने सहकार खात्याकडे पतसंस्था फेडरेशन, पतसंस्था स्थैर्य निधी सहकरी संघ सातत्याने पाठपुरवठा करत आहे. त्यामुळे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या सूचनेनुसार पतसंस्थांच्या प्रश्न सोडविण्यासाठी मार्ग काढण्यासाठी कच्चा आराखडा तयार करण्यासाठी स्वीय सहाय्यक संतोष पाटील यांना सूचना केल्या होत्या. त्यासंबधी पतसंस्था फेडरेशन, स्थैर्यनिधी सहकारी संघ यांच्या समवेत पुणे येथे महत्वाची बैठक झाली. या बैठकीस राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, सहकारी पतसंस्था आंदोलनाचे निमंत्रक वसंत लोढा, सहकार खात्याचे वरिष्ठ अधिकारी धनंजय डोईफोडे, पतसंस्था फेडरेशनचे महासचिव डॉ.शांतीलाल शिंगी, संचालक अॅड.अशितोष पटवर्धन, सहकार तज्ञ गणेश निमकर, पतसंस्था फेडरेशनच्या व्यवस्थापिका सुरेखा लवांडे उपस्थित होते. या बैठकीमध्ये कच्चा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यावर गुरुवारी पुण्यातील साखर संकुल येथे सहकार मंत्री सुभाष देशमुख, सहकार खात्याचे आयुक्त, पतसंस्था संघटनेचे पदाधिकारी यांच्या समवेत अंतिम बैठक होणार आहे.
पतसंस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी पुण्यात अंतिम बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 18:26 IST
गुरुवारी २४ आॅगस्ट रोजी पुण्यातील साखर संकुल येथे सहकार मंत्री सुभाष देशमुख, सहकार खात्याचे आयुक्त व पतसंस्था संघटनेचे पदाधिकारी यांच्या समवेत पतसंस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी अंतिम बैठक होणार आहे
पतसंस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी पुण्यात अंतिम बैठक
ठळक मुद्देसहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थिती पुण्यातील साखर संकुलात गुरूवारी चर्चा