दहिगावने : शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील दघ्नेश्वर शिवालयाचे प्रमुख कृष्णदेव महाराज काळे (देवा) यांचे शनिवारी (दि. १८) पहाटे देहावसान झाले. गावातून अंत्ययात्रा काढून दघ्नेश्वर शिवालयात त्यांचे पार्थिव नेण्यात आले. तेथे पुरोहितांच्या मंत्रोच्चारात नवनाथ महाराज काळे यांच्या हस्ते मंत्राग्नी देऊन अखेरचा निरोप देण्यात आला.
यावेळी भास्करगिरी महाराज म्हणाले, कृष्णदेव महाराज काळे शांत, संयमी व अभ्यासू होते. ते आयुर्वेदाचे गाढे अभ्यासक होते. ज्ञानेश्वरी त्यांच्या तोंडपाठ होती. ते जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आदर्श व्यक्तिमत्त्व होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांवर ते नितांत प्रेम करत. गुरुवर्य किसनगिरी बाबा आणि गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले यांच्या शिष्यांपैकी ते एक होते.
यावेळी शिवाजी महाराज देशमुख, उद्धव महाराज मंडलिक, रामभाऊ महाराज राऊत, आमदार मोनिका राजळे, पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले, राम महाराज झिंजुर्के, देविदास महाराज म्हस्के, डॉ. मेटे महाराज आदींनी मनोगत व्यक्त केले.
----
१८ कृष्णदेव महाराज
180921\pano_20210918_140927.jpg
???????? - ?????? ??????????? ???????? ????? ????????? ????????? ?????? ?.?.?.???????? ?????? ???? (????) ????? ??.????????? ????? ???????? ????. ????????????????? ???????????? ?????? ???? ????. (???? - ????????? ????)