शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीवरून पडून मजुराचा मृत्यू

By सचिन धर्मापुरीकर | Updated: January 6, 2024 17:01 IST

कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर येथील घटना.

सचिन धर्मापुरीकर, कोपरगाव : बांधकाम सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीवरून पडल्याने मजुराचा मृत्यू  झाल्याची घटना शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर शिवारात घडली. ईश्वरचंद भवरलाल मेघवान (वय ३३, रा. चकमिटाई, सीकर, राजस्थान) असे मयत इसमाचे नाव आहे.

कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर शिवारात अमरधाम शेजारी गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरु आहे. ईश्वर मेघवान व विकास नायक हे राजस्थान येथील कामगार येथे काम करीत असतात. नुकतेच ते आपल्या घरून दिवाळी  करून कामावर आले होते. त्यांच्या राहण्याची व्यवस्था बांधकामच्या जवळच केलेली आहे. शनिवारी सकाळी जेवण करून त्यांनी कामाची सुरवात केली. दोघे पाण्याच्या टाकीवर चढले होते. ग्राईंडरने काम चालू होते, तेव्हा ग्राईंडरची वायर वारंवार निघत होती. यावेळी विकास नायक याने इश्वरचंदला पाण्याच्या टाकीवरून खाली पाठविले व वायरवर लक्ष देण्यास सांगितले. पाण्याच्या टाकीच्या एका बाजूचे काम पूर्ण झाल्यानंतर ईश्वर यास वर बोलावले. बांधकाम साहित्य सरकवत असताना ईश्वरचंदचा तोल गेला व तो जवळपास पन्नास फुटावरून खाली पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला. 

त्याच्या आधारकार्ड वरील माहिती नुसार तो ३३ वर्षाचा असून त्यावर त्याचे नाव ईश्वरचंद भवरलाल मेघवान असल्याचे कळते. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर