शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त ऊस वाचविण्यासाठी केव्हीकेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:25 IST

दहिगावने : संपूर्ण नगर जिल्ह्यात यावर्षी सुरुवातीच्या काळात पाऊस बेताचाच झाला. परंतु दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेवगाव तालुक्यातील वरुर, ...

दहिगावने : संपूर्ण नगर जिल्ह्यात यावर्षी सुरुवातीच्या काळात पाऊस बेताचाच झाला. परंतु दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेवगाव तालुक्यातील वरुर, आखेगाव, भगूर आदी भागांतील पूरपरिस्थितीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. हे नुकसान भरून न येण्यासाखे असले तरी शेतातील उभ्या ऊस पिकाला वाचविण्यासाठी दहिगावने येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीकेने) पुढाकार घेतला आहे.

दहिगावने येथील कृषी विज्ञान केंद्रांचे प्रमुख शास्रज्ञ नारायण निबे यांनी ऊस वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. ज्या उसाच्या शेतात पाणी साचलेले आहे, त्या क्षेत्रात उताराच्या बाजूने चर काढावेत. वाळलेले ऊस शेताबाहेर काढावेत. पीक लहान असल्यास वापसा येताच मुळाभोवती एकरी दोन लिटर ट्रायकोडर्मा २०० लिटर पाण्यात मिसळून त्याची आळवणी करावी. नत्र: स्फुरद: पालाश व ८:८:८ व मायक्रोन्युट्रीएंट प्रत्येकी १००मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारल्यास पिकाची काळोखी वाढून उसाच्या कोंबाची जाडी व फुटवा वाढण्यास मदत होईल. पाण्यामुळे जमिनीमध्ये मुळे कुजू नये म्हणून १० ग्रॅम कार्बेन्डाझिम १० लिटर पाण्यात मिसळून मुळीभोवती द्यावे. पीक १.५ ते २ महिन्यांचे असेल तर १२:६१:०० व मायक्रोन्युट्रीएंट प्रत्येकी १०० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. वापसा आल्यानंतर एकरी २ गोण्या १२:३२:१६ किंवा १०:२६:२६ व १ गोणी युरिया अशी खतांची मात्रा द्यावी. ऊस पिकावर लष्करी अळी, पांढरीमाशी या किडी तसेच पोक्का बोइंग, तांबेरा प्रादुर्भाव होणेची शक्यता आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी ६ ते ७ महिने वय असलेल्या ऊस पिकास एकरी १ गोणी युरिया किंवा दोन गोणी अमोनियम सल्फेट व ३० किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. तांबेरा, पानावरील ठिपके, पोक्का बोइंग रोगांचे नियंत्रणासाठी डायथेन एम ४५-२५ ग्रॅम १० लिटर पाण्यांत मिसळून १० दिवसांच्या अंतराने कमीतकमी दोन फवारण्या घ्याव्यात. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी प्रत्येकी १०० मिली बिव्हेरिया व मेटारायजिम १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा ४ मिली एमिडाक्लोप्रिड १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.