शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमध्ये जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शिक्षकांचे घंदानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 15:38 IST

राज्य सरकारच्या सेवेत २००५ पासून नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योेजना लागू करण्याच्या मागणीसाठी जिल्हाभरातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन सुरु केले आहे.

ठळक मुद्देजुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी
अहमदनगर : राज्य सरकारच्या सेवेत २००५ पासून नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योेजना लागू करण्याच्या मागणीसाठी जिल्हाभरातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन सुरु केले आहे. या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन सुरु करण्यात आले आहे. जुनी पेन्शन सुरु करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९८२ व १९८४ ची पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी घंदानाद आंदोलन सुरु करण्यात आले आहे. संघटनेचे विश्वस्त बाजीराव मोढवे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठोकळ, जिल्हासरचिटणीस भाऊसाहेब पाचारणे, कार्याध्यक्ष सचिन लाबगे, कोषाध्यक्ष अमोल सोनवणे, राज्य निरीक्षक वृंदा तेलोरे, शैलेश खणकर, मुकुंद कुलांगे, ऋषिकेश गोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक आंदोलनात उतरले आहेत. जिल्हाधिकारी यांना संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सेवेत ३१ आॅक्टोबर २००५ नंतर नियुक्त होणा-या कर्मचा-यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९८२ व १९८४ या अंतर्गत असलेली पेन्शन योजना बंद करण्यात आली आहे. ही योजना बंद करुन नवीन परिभाषित अंशदायी योजना व राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. मात्र ही योजना कर्मचा-यांचे भविष्य अंधकारात टाकणारी आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे. जुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन तात्काळ प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते मात्र तीन महिने उलटून गेले असून कोणतीही कार्यवाही झाली नाही. शिक्षकांची हक्काची वरीष्ठ वेतनश्रेणीही शिक्षकांकडून हिरावून घेतली आहे. आज शिक्षक शाळा प्रगत व्हावी यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. या कामासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. वरीष्ठ वेतनश्रेणीचा अनेक शिक्षकांवर जाचक अटीमुळे अन्याय होत आहे. अनेक शिक्षक स्वत: लोकवर्गणी गोळा करुन शाळा डिजिटल व प्रगत करत आहेत. त्यामुळ्े महाराष्ट्रातील हजारो शाळा आयएसओ नामांकित झाल्या आहेत. अशा कामासाठी प्रोत्साहन देण्याऐवजी शासन अन्यायकारक भुमिका घेत आहे. २३ आॅक्टोबर २०१७ चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी करण्यात येत आहे. या मागणीबाबत शासनाला जाग यावी यासाठी घंटानाद आंदोलन करत आहोत. तरी शासनाने अन्यायकारक धोरणे रद्द करुन जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
टॅग्स :Ahmednagarअहमदनगर