येथील मयूर पटारे युवा मंच आणि लोकसेवा महाविकास आघाडीच्या वतीने व्हॉलिबॉल मैदानाचे लोकार्पण माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुरकुटे यांनी वयाच्या ८०व्या वर्षी देखील सलग दोन तास खेळाचा मनसोक्त आनंद लुटला. त्यांच्यामध्ये असलेली ऊर्जा पाहून उपस्थित सर्वच अवाक् झाले.
सामन्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने मुरकुटे व सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. लवकरच राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मयूर पटारे यांनी सांगितले.
यावेळी ज्ञानदेव साळुंके, मंजाबापू थोरात, उपसरपंच कान्हा खंडागळे, शिवाजी शिंदे,बापूसाहेब पटारे,दत्तात्रय नाईक, बापूराव त्रिभुवन, सुरेश पटारे, संजय पटारे, नीरज मुरकुटे, प्रदीप पटारे, रामभाऊ कसार, सतीश आहेर, राजेंद्र रायकर, बाळासाहेब कांबळे, उद्धव आहेर, कृष्णा देसाई, यश ससे, उत्तमराव डांगे उपस्थित होते.
---------
फोटो ओळी : २१०६ २०२१ व्हॉलीबॉल
टाकळीभान येथे व्हॉलिबॉल मैदानाचे उद्घाटन करताना भानुदास मुरकुटे.
------