शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डी खटला : आरोपीचे वकील वाहतूक कोंडीत अडकल्याने सुनावणी लांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 18:14 IST

अहमदनगर : कोपर्डी खटल्यातील आरोपी संतोष भवाळचे वकील अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे बुधवारी पुणे येथून नगरला येताना वाघोली येथे वाहतूक कोंडीत ...

अहमदनगर : कोपर्डी खटल्यातील आरोपी संतोष भवाळचे वकील अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे बुधवारी पुणे येथून नगरला येताना वाघोली येथे वाहतूक कोंडीत अडकल्याने त्यांना न्यायालयात हजर राहता आले नाही. त्यामुळे खटल्याची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली.कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याची जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे़ या खटल्यात सरकारी व बचाव पक्षाच्यावतीने सर्व साक्षीदारांची तपासणी पूर्ण झाली आहे. आता फक्त अंतिम युक्तिवाद बाकी आहे़ बुधवारी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम हे सरकारी पक्षाच्यावतीने अंतिम युक्तिवाद करणार होते. मात्र आरोपी संतोष भवाळ याचे वकील खोपडे न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे पुढील सुनावणी २६,२७,२८ आॅक्टोबर रोजी होणार आहे.दरम्यान अ‍ॅड. निकम यांनी सांगितले की, खटल्याचे कामकाज लवकर पूर्ण व्हावे यासाठी मी कोल्हापूर येथील कामकाज आटोपून रात्री प्रवास करून नगरला पहाटे पोहोचलो. आरोपीचे वकील मात्र पुणे येथून नगरला पोहोचू शकले नाहीत ही खेदाची बाब आहे. येण्यास अडचण होती तर त्यांनी फोन करून कळविणे गरजेचे होते़ आमचा वेळ वाचला असता. पुणे येथून नगरला येण्यासाठी वाघोली हा एकमेव मार्ग नाही ते दुस-या मार्गानेही येऊ शकत होते़ अ‍ॅड. खोपडे पुढील सुनावणीला हजर राहतील अशी अपेक्षा आहे असे निकम म्हणाले़ कोपर्डी खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने ३१ तर आरोपी पक्षाच्यावतीने १ अशा ३२ साक्षीदारांची तपासणी पूर्ण झाली आहे. आता सरकारी पक्ष व बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद बाकी असल्याने हा खटला अंतिम टप्प्यात आहे.