शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कोळपेवाडी दरोडा, खून प्रकरणातील कुख्यात गुंड पपड्या काळे जेरबंद; तीन राज्यात गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 13:50 IST

गत महिन्यात कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे दरोडा टाकून सुमारे ३५ लाखांचा ऐवज लंपास करणारा तसेच गोळीबार करुन एका सराफाला ठार तर दुसऱ्या सराफाला गंभीर जखमी करणारा पपड्या काळे याला अखेर अहमदनगर पोलिसांनी बेड्या ठोकण्यात यश मिळविले आहे.

ठळक मुद्देकोळपेवाडी येथे दरोडा टाकून सुमारे ३५ लाखांचा ऐवज लंपास करणारा तसेच गोळीबार करुन एका सराफाला ठार तर दुसऱ्या सराफाला गंभीर जखमी करणारा पपड्या काळे याला अटकबुलढाणा जिल्ह्यातील सेंदला (ता. मेहेकर) येथून सोमवारी पहाटे तीन वाजता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पपड्या काळेच्या टोळीने यापूर्वी आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी धाडसी दरोडे टाकले आहेत. साधूच्या वेषात आला बायकोला भेटायला

अहमदनगर : गत महिन्यात कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे दरोडा टाकून सुमारे ३५ लाखांचा ऐवज लंपास करणारा तसेच गोळीबार करुन एका सराफाला ठार तर दुसऱ्या सराफाला गंभीर जखमी करणारा पपड्या काळे याला अखेर अहमदनगर पोलिसांनी बेड्या ठोकण्यात यश मिळविले आहे.बुलढाणा जिल्ह्यातील सेंदला (ता. मेहेकर) येथून सोमवारी पहाटे तीन वाजता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पपड्या काळेच्या टोळीने यापूर्वी आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी धाडसी दरोडे टाकले आहेत. पपड्या काळे याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये २० गुन्हे दाखल असून, तीन गुन्ह्यांमध्ये त्याल जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मिना, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार, मेहेकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान, सहाय्यक निरीक्षक रोहन खंडागळे, कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, योगेश गोसावी, दिगंबर कारखिले, अण्णा पवार, रवींद्र कर्डिले, रवी सोनटक्के, मनोज गोसावी यांच्या पथकाने ही कारवाई केली.१९ आॅगस्ट रोजी कोळपेवाडी येथील लक्ष्मी ज्वेलर्सववर पपड्या काळेच्या गँगने दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला होता. तसेच दुकानाचे मालक गणेश धाडगे व शाम धाडगे यांच्यावर बोळीबार करुन शाम धाडगे यांची हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत पपड्या गँगमधील १३ आरोपी व सोने, चांदी विकत घेणारे तीन सराफ अशा एकूण १६ जणांना अटक केली आहे.

साधूच्या वेषात आला बायकोला भेटायला

पपड्या काळे साधूचा वेष धारण करुन सेंदला (ता. मेहेकर) येथील एका पारधी वस्तीवर राहणा-या त्याच्या पत्नीला भेटायला येणार असल्याची माहिती पोलिसांना खब-यामार्फत मिळाली. पोलिसांनी पाळत ठेवून सोमवारी पहाटे तीन वाजता छापा टाकून पपड्या काळे याला बेड्या ठोकल्या.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस