शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

किसान पुत्र संघर्ष यात्रा अहमदनगरमध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:20 IST

या यात्रेच्या माध्यमातून अहमदनगरसह संपूर्ण महाराष्ट्रातील युवक-युवती शेतकऱ्यांच्या आंदोलनाला खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी दिल्लीला धडकणार आहेत. हुतात्मा स्मारकात चौथे ...

या यात्रेच्या माध्यमातून अहमदनगरसह संपूर्ण महाराष्ट्रातील युवक-युवती शेतकऱ्यांच्या आंदोलनाला खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी दिल्लीला धडकणार आहेत. हुतात्मा स्मारकात चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करून व त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सभा घेण्यात आली. यावेळी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे राज्य अध्यक्ष विराज देवांग, ऑल इंडिया यूथ फेडरेशनचे राज्य सचिव संतोष खोडदे, अविनाश दोंदे, फैजान अन्सारी, दीपक शिरसाठ, कार्तिक पासळकर, कॉ. सुभाष लांडे, भैरवनाथ वाकळे, फिरोज शेख, समृद्धी वाकळे, अरुण थिटे, अमोल चेमटे, राजू नन्न्वरे आदींसह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

विराज देवांग म्हणाले की, भांडवलदारांचे सरकार सत्तेवर असल्याने शेतकऱ्यांवर अन्याय, अत्याचार सुरू आहे. नैतिकता विकून सरकार आपले धोरण राबवीत आहे. या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारे तिन्ही काळे कायदे रद्द करण्याबाबत जागृती करण्यात येत आहे. महाराष्ट्रातून निघालेल्या ही किसान पुत्र संघर्ष यात्रा मुंबईत एकवटणार असून, ८ फेब्रुवारी रोजी दिल्लीला रवाना होणार आहे.

------

फोटो - ०६किसान पुत्र यात्रा

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघालेली किसान पुत्र संघर्ष यात्रा हुतात्मा स्मारक येथील चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस्थळी दाखल झाली.