दहिगावने : शेवगाव तालुक्यातील दहिगावने गटातील रांजणी येथील प्रा. किसन चव्हाण यांच्या ‘आंदकोळ’ आत्मकथनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. पदवी परीक्षेत मराठी विषयाच्या दलित साहित्य अंतर्गत याचा समावेश झाला असल्याचे पत्र प्रा. चव्हाण यांना मराठी विभाग प्रमुख डॉ. देवीदास गायकवाड यांनी दिले आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले चव्हाण यांच्या या आत्मकथनाची विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रा. चव्हाण यांनी परिवर्तनाची भूमिका घेऊन स्वत: जगलेले अनुभव ‘आंदकोळ’ या आत्मकथनातून परखडपणे मांडले आहेत. याबाबत चव्हाण म्हणाले, आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या आत्मकथनातून ‘भोगवटा’ मांडलेला आहे. ही दलित साहित्याची पहिली पिढी होती. आंदकोळच्या माध्यमातून दलित साहित्याची दुसरी पिढी जगासमोर आली आहे.
190821\1452img-20210819-wa0054.jpg
पासपोर्ट फोटो प्रा किसन चव्हाण