शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण झालेली मुले पुण्यात सापडली

By admin | Updated: March 13, 2016 23:58 IST

अहमदनगर : खासगी क्लासला न जाता तिन्ही मुले रेल्वेतून दौंडला आणि तेथून पुण्यात गेली. पुण्याजवळील केतकावळे येथे प्रतिबालाजीचे दर्शन घेवून पुन्हा पुण्यात परतली.

अहमदनगर : खासगी क्लासला न जाता तिन्ही मुले रेल्वेतून दौंडला आणि तेथून पुण्यात गेली. पुण्याजवळील केतकावळे येथे प्रतिबालाजीचे दर्शन घेवून पुन्हा पुण्यात परतली. तेथून त्यांनी हैदराबादला जाण्याची योजना आखली. मात्र मुलांचा शोध करणाऱ्या नातेवाईकांनी तीन मुलांना रेल्वे स्टेशनवर पाहिले आणि नगरला कळविले. नगरच्या पोलिसांनी पुण्याच्या पोलिसांमार्फत त्यांना ताब्यात घेतले आणि दुपारी नगरला आणले. कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर तिन्ही मुलांना त्यांच्या पालकांकडे सोपविले. मुलांच्या अपहरणनाट्याने मात्र पोलीस अधिकारी चांगलेच घामाघूम झाले होते.एका खासगी क्लासला जाणारी तीन शाळकरी मुले शुक्रवारी दुपारी एक वाजता नगर शहरातील महाजन गल्लीतून गायब झाली होती. तेजस संभाजी निमसे (वय १४, रा. मांडवे, ता. नगर), अभिषेक चंद्रकांत म्याना (वय १४, रा. भराडगल्ली, तोफखाना) आणि विशाल रवींद्र जाधव (वय १४, रा. पानसरे गल्ली, अर्बन बँक चौक) अशी त्या मुलांची नावे आहेत. मुलांच्या पालकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती. १४ वर्षे वयाची मुले असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ मालकर, सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, संदीप पाटील यांनी अथक परिश्रम करून रविवारी सकाळपर्यंत मुलाचा शोध लावला.तिन्ही मुलांनी पुण्याचे तिकीट काढल्याची माहिती पोलिसांना नगरच्या रेल्वे स्थानकावरच मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी दौंड आणि पुणे रेल्वे स्थानकावर मुलांचा कसून शोध घेतला. नगर रेल्वे स्थानकावर विशाल जाधवचा नातेवाईक असलेल्या एका पोस्टमास्तरने मुले रेल्वेस्थानकात आल्याचे पाहिले होते. मात्र ती कोणत्या रेल्वेत बसली, याबाबत त्यांना माहिती नव्हती. सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधून रेल्वे स्थानकावर शोध सुरू ठेवला. मुलांची छायाचित्रे व्हॉटस् अ‍ॅपवरून प्रसारित केली. दौंड जंक्शन, पुणे रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आली. मात्र तिथे शोध लागला नाही. दरम्यान, शोध घेणाऱ्या मुलांच्या नातेवाईकांना तिन्ही मुले रविवारी सकाळी पुणे रेल्वेस्थानकावर आढळून आली. तसेच विशाल जाधव याने त्याच्या मामाला मोबाईलद्वारे पुण्याच्या रेल्वेस्थानकावर आल्याची माहिती दिली. त्यानंतर नगरचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी मुलांना पुण्यातून ताब्यात घेतले. ही मुले दुपारी नगरला आणल्यानंतर त्यांना रात्री पालकांच्या ताब्यात देण्यात आले. (प्रतिनिधी)हैदराबादला जाण्याचा बेततिघांपैकी तेजस निमसे याच्याकडे तीन हजार रुपये होते. तोच मास्टरमार्इंड होता. त्यानेच पुण्याला जाण्याची योजना आखली. घरच्यांना सांगून पुण्याला जायचे ठरविले असते तर घरचे रागावले असते, यामुळे त्यांनी घरी न सांगता शुक्रवारी दुपारीच पुण्याला जायचा बेत आखला. गोवा-निजामाबाद एक्सप्रेसने आधी दौंड, नंतर पुणे, तेथून केतकावळे येथे जावून बालाजीचे दर्शन घेतले. शनिवारची रात्र रेल्वेस्टेशनवरच काढली. रविवारी सकाळी हैदराबादला जाण्याचा त्यांचा बेत होता. मात्र नातेवाईकांनी पाहिल्याने त्यांचा बेत हुकला. ‘पैसे संपल्याने आम्ही नगरकडेच निघालो होतो. रविवारी येणार होतो. पुणे येथे जावून परत यायचे होते. त्यामुळे घरच्यांना सांगितले नाही’, असे तिन्ही मुलांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, तिघांपैकी एकाने यापूर्वी दोनवेळा घरी न सांगता गायब होण्याचा पराक्रम केला होता, असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. तिन्ही मुले नगरमधील एका नामांकित शाळेत नववीच्या वर्गात शिकत असून महाजन गल्लीतील खासगी क्लासमुळे त्यांच्यात घनिष्ठ मैत्री आहे.