शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘खेलो इंडिया’त नगरी झेंडा : श्रीगोंद्याच्या भाग्यश्री फंडला सुवर्ण, कर्जतच्या सोनाली मंडलिकला कांस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 21:52 IST

दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेत ५२ किलो वजनगटात श्रीगोंदा येथील भाग्यश्री फंड हिने महाराष्ट्राला एकमेव सुवर्णपदक मिळवून दिले. कर्जतच्या सोनाली मंडलिक हिने ४६ किलो वजनगटात कांस्यपदक मिळविले.

अहमदनगर/श्रीगोंदा : दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेत ५२ किलो वजनगटात श्रीगोंदा येथील भाग्यश्री फंड हिने महाराष्ट्राला एकमेव सुवर्णपदक मिळवून दिले. हरियाणाच्या संगीताला भाग्यश्रीने चितपट करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. तर कर्जतच्या सोनाली मंडलिक हिने ४६ किलो वजनगटात कांस्यपदक मिळविले.खेलो इंडिया स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या महिला कुस्ती संघात टाकळी लोणार (ता. श्रीगोंदा) येथील भाग्यश्री फंड व कर्जतची सोनाली मंडलिक या दोघींची निवड झाली होती. भाग्यश्री फंड ही भोसरी फाटा (पुणे) येथील श्री सयाजीनाथ मोझे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये, तर सोनाली मंडलिक ही कर्जत येथील अमरनाथ विद्यालयात शिक्षण घेत आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली किरण मोरे यांनी भाग्यश्रीला कुस्तीचे प्रशिक्षण दिले आहे. सोनाली मंडलिक हिला गणेश शेळके हे कुस्तीचे प्रशिक्षण देत आहेत. दोघीही यापूर्वी राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत खेळलेल्या असून, या स्पर्धेत दोघींनीही सुवर्णकामगिरी केली होती. खेलो इंडिया स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे कुस्ती प्रशिक्षक दत्ता माने व संदीप वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनाली व भाग्यश्री यांनी सराव केला.महिला कुस्तीत महाराष्ट्राकडून एकमेव सुवर्ण पटकावणा-या भाग्यश्री फंड हिने हरियाणाच्या संगीताला लपेट डावावर अवघ्या १ मिनीट २० सेकंदात अस्मान दाखविले. सुवर्णपदकाची मानकरी ठरलेल्या भाग्यश्रीला पाच लाखांचे पारितोषिक केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने प्रदान करण्यात आले.

खेलो इंडियात अशा झाल्या लढती

महिला कुस्ती स्पर्धेत ५२ किलो वजनगटात भाग्यश्री फंडने पहिल्य फेरीत काजल जाधवचा पराभव केला. दुस-या फेरीत उत्तर प्रदेशच्या साधनाला लोळविले. तिस-या फेरीत दिल्लीच्या शिवानीला धूळ चारुन अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत हरियाणाची आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू संगीता हिला अस्मान दाखवून भाग्यश्रीने सुवर्णपदकावर नाव कोरले. ४६ किलो वजनगटात कर्जतच्या सोनाली मंडलिक हिने पंजाबच्या गोरिया हिच्यावर ८ गुणांनी विजय मिळवून तिस-या फेरीत प्रवेश केला. तिस-या फेरीत हरियाणाच्या हन्या कुमारी हिने सोनालीवर विजय मिळविला. त्यामुळे सोनालीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

आई-वडिलांना आनंदाश्रू

भाग्यश्रीचे वडील पोलीस दलात नाशिक येथे कार्यरत आहेत. भाग्यश्रीची आई भाग्यश्री व धनश्रीसह आळंदीत राहत आहेत. भाग्यश्रीने सुवर्णपदक जिंकल्याचे टीव्हीवर पाहून आई-वडिलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तराळले. तर टाकळी लोणार गावात फटाके फोडून ग्रामस्थांनी जल्लोष केला.

आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड व किरण यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केल्याने खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला पहिले सुवर्णपदक मिळवून देण्याचे स्वप्न साकार झाले आहे. मला २०२४ होणा-या आॅलिंपिक स्पर्धेचे मैदान गाजवायचे आहे. त्यासाठी खूप मेहनत घेणार आहे.-भाग्यश्री फंड, सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू

राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत सोनालीने सुवर्णपदक पटकावले होते़ त्यामुळे तिची खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली़ खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याच्या तयारीने सोनाली मैदानात उतरली होती़ मात्र, तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले़-कोंडिबा मंडलिक, सोनालीचे वडील

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर