शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद विरोधी दिवस/‘कोरोना’च्या दहशतीविरोधात खाकीतला वॉरिअर्स लढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 11:53 IST

अहमदनगर : घटना कोणतीही असो जेथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो, मानवी जीविताला धोका निर्माण होतो तेथे पोलीस नावाचा योद्धा जनतेच्या संरक्षणासाठी उभा राहतो. आज जगभरासह आपल्याकडेही कोरोना या साथीच्या आजाराची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाच्या या दहशतीला हरविण्यासाठी खाकी वर्दीतला वॉरिअर्स अविरत कार्यरत आहे. जिल्हा पोलीस दलाने उपलब्ध मनुष्यबळ व आहे त्या यंत्रणेवर काम करत ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य खरे ठरविले आहे.

अरुण वाघमोडेअहमदनगर : घटना कोणतीही असो जेथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो, मानवी जीविताला धोका निर्माण होतो तेथे पोलीस नावाचा योद्धा जनतेच्या संरक्षणासाठी उभा राहतो. आज जगभरासह आपल्याकडेही कोरोना या साथीच्या आजाराची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाच्या या दहशतीला हरविण्यासाठी खाकी वर्दीतला वॉरिअर्स अविरत कार्यरत आहे. जिल्हा पोलीस दलाने उपलब्ध मनुष्यबळ व आहे त्या यंत्रणेवर काम करत ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य खरे ठरविले आहे.विस्ताराने महाराष्ट्रात सर्वाधिक मोठा अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्याची आज ५० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत. सध्या जिल्ह्यात मात्र अवघे ३२०० पोलीस कार्यरत आहेत. यात वयाची पन्नाशी ओलांडणारे एक हजारच्या आसपास पोलीस आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ तास कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात ८०० पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून यातील काही जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. जनतेच्या संरक्षणासाठी मात्र या आजाराची भीती दूर सारून जिल्ह्यात कार्यरत असलेले पोलीस दररोज सकाळी ड्युटीसाठी घराबाहेर पडत आहे. कामाचा ताण वाढल्याने अनेक ठिकाणी पोलिसांना तब्बल सोळा ते अठरा तास ड्युटी करण्याची वेळ आली आहे. गर्दी कमी करणे, वाहनांची तपासणी, स्थलांतरितांना सुरक्षित पोहोचविणे, विविध ठिकाणी बंदोबस्त, अवैध व्यवसायांवर कारवाई अशी एक ना अनेक कामे सध्या पोलिसांना आहेत. रस्त्यावर आॅन ड्युटी चोवीस तास उभा राहणाºया पोलिसांमुळे कोरोनाला रोखण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे.----

सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने नगर जिल्ह्याला बाहेरचा बंदोबस्त मिळालेला नाही. त्यामुळे आहे त्या मनुष्यबळातच कामाचे नियोजन करण्यात आले आहे. पोलीस कर्मचारी व अधिकाºयांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. ज्यांचे वय ५० पेक्षा जास्त आहे, अशा कर्मचाºयांना फिल्डवरती काम न देता कार्यालयीन काम देण्यात आलेले आहे. वैद्यकीय उपचारासाठी ज्यांना रजेची गरज आहे, त्या कर्मचाºयांना रजा देण्यात आलेली आहे. स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत सर्व कर्मचाºयांना आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचारी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यवस्थितपणे आपले कर्तव्य निभावत आहेत.    

- डॉ. सागर पाटील, अपर पोलीस अधीक्षक