शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

केलवडमध्ये महिनाभरात आठ ठिकाणी चो-या

By admin | Updated: May 29, 2017 13:04 IST

राहाता तालुक्यातील केलवड गाव भुरट्या चोरट्यांच्या धुमाकुळामुळे चांगलेच हादरले आहे. या गावात महिन्याभरात तब्बल आठ ठिकाणी लहान मोठ्या चो-या झाल्या आहेत.

लोकमत न्युज नटवर्क अस्तगाव (अहमदनगर) : राहाता तालुक्यातील केलवड गाव भुरट्या चोरट्यांच्या धुमाकुळामुळे चांगलेच हादरले आहे. या गावात महिन्याभरात तब्बल आठ ठिकाणी लहान मोठ्या चो-या झाल्या आहेत. पोपट गोडगे यांच्या घरात सुमारे दीड लाखाच्या मालमत्तेची चोरी झाली होती. त्यानंतर काही दिवसातांच पुन्हा गोडगे यांचे घर फोडण्यात आले परंतु यावेळी चोरट्यांचा डाव फसला. रावसाहेब ठोंबरे यांच्या भरदिवसा दोन शेळ्या व गॅसची टाकी चोरीस गेली. सुंदरदास ठोबरे यांच्या शेतातील बोरची मोटार काढुन नेण्यात आली. दीपक कादळकर यांच्या विहीरीतून मोटार चोरण्यात आली तर त्यानंतर सोपान कांदळकर यांच्या शेतातील पाईप चोरण्यात आले. लक्ष्मण कांदळकर यांची विजेची केबल चोरट्यांनी पळविली. गंगाधर कांदळकर यांच्या शेतातील पाण्याच्या नियोजनासाठी असणारा वॉल अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास पळविला . तर रविवार २८ मे २०१७ रोजी गावातील बाळासाहेब खंडांगळे यांचे मोटारसायकल पंचरचे दुकान फोडण्यात आले. दुकानचे शेटर तोडून चोरट्यांनी मोटारसायकलच्या जवळपास ३० ते ३५ टुपा पळविल्या. केलवड गावातीलच भुरटी चोरट्यांची टोळी वारंवार धुमाकुळ घालत असल्याचा अंदाज काही ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. केलवड गाव हे राहाता तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव असुन बहुतांश लोक हे वाड्यावस्त्यांवर राहतात. चोरीच्या जास्तीत जास्त घटना ह्या वाड्यावस्त्यावर घडल्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. राहाता पोलिसांचे या गंभीर प्रकाराकडे लक्ष नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केली आहे. तसेच पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.