अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नगर तालुक्यातील वाळकी येथील सुहास नारायण कासार यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या हस्ते कासार यांना बुधवारी नियुक्तीपत्र देण्यात आले. कासार हे राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, प्रदेश चिटणीस अंबादास गारुडकर, केशव बेरड, भगवान बोठे, रुपेश काळेवाघ आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कासार
By | Updated: December 5, 2020 04:33 IST