शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीतील टोळी कर्जत पोलिसांनी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 12:51 IST

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीतील चौघांना कर्जत पोलिसांनी पाठलाग करून रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून एक गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे व एक चारचाकी वाहन ताब्यात घेतले आहे.

कर्जत : दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीतील चौघांना कर्जत पोलिसांनी पाठलाग करून रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून एक गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे व एक चारचाकी वाहन ताब्यात घेतले आहे.मिथुन मारूती पालघर (वय ३२), अनिल अंकुश शिंदे (वय-३५), सुनिल गजानन खानेकर (वय-२८), सुधीर निमसे (वय-३१) (सर्व राहणार- मुळशी. जिल्हा- पुणे) यांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. कर्जत - श्रीगोंदा रोडवर पोलिसांनी ही कारवाई केली.कर्जत तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांना दुरगाव तलावाजवळ एक संशयास्पद चार चाकी गाडी उभी असल्याची खबर मिळाली. त्यानंतर चव्हाण यांनी पोलीस पथक घेऊन खाजगी गाडीने दुरगांव तलाव गाठला. उभ्या असलेल्या चारचाकी वाहनातील आरोपींनी गाडी भरधाव वेगाने श्रीगोंदा रोडने पळवली. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. याबाबत श्रीगोंदा पोलीसांना माहिती देत नाकाबंदी करण्यास सांगितले. श्रीगोंदा पोलिसांनी हिरडगांव फाटा येथे तात्काळ नाकाबंदी केली. तेथेच वाहनासह चार आरोपी सापडले तर दोन आरोपी पळून गेले. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यामध्ये एक गावठी कट्टा व सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. मिथुन मारूती पालघर (वय ३२), अनिल अंकुश शिंदे (वय-३५), सुनिल गजानन खानेकर (वय-२८), सुधीर निमसे (वय-३१) (सर्व राहणार- मुळशी. जिल्हा- पुणे) यांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे.या पथकात पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक शहादेव पालवे, पोलिस कॉन्स्टेबल सुनिल खैरे, सागर जंगम, फिरोज पठाण, अमोल चनै, इरफान शेख, रमेश जाधव यांचा समावेश होता. या प्रकरणात फरार झालेल्या दोन आरोपींचा शोध कर्जतचे पोलीस घेत आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जतahmednagar policeअहमदनगर पोलीस