शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत : ‘मी भाजपाचीच’- सभापती साधना कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 17:46 IST

आपण भाजपा-शिवसेनेच्या सहकार्यानेच कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान झाले असून आपण भाजपाचेच आहोत.

कर्जत: आपण भाजपा-शिवसेनेच्या सहकार्यानेच कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान झाले असून आपण भाजपाचेच आहोत. यापुढे पालकमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण भाजपातच काम करणार आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या पंचायत समिती सदस्य तथा नवनिर्वाचित सभापती साधना कदम यांनी जाहीर केले. पत्रकार परिषदेत त्यांनी ही भुमिका जाहीर करत पुन्हा एकदा राष्ट्रवादीला कात्रजचा घाट दाखविला.कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवड २० रोजी पार पडण्या अगोदर एक दिवस आधी पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी भाजपात प्रवेश केलेल्या साधना कदम यांनी निवडीनंतर पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात जात सत्कार स्वीकारुन भाजपाला धक्का दिला होता. मात्र शुक्रवार २४ रोजी सभापती साधना कदम यांनी पुन्हा यु-टर्न घेत आपण सोमवारी भाजप आणि शिवसेनाच्या साह्याने सभापती झालो असल्याचे पुनरोच्चार पत्रकार परिषदेत केला.कदम म्हणाल्या, आपण पालकमंत्री राम शिंदे यांची भेट घेत चोंडी येथे त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यासह भाजपामध्ये प्रवेश केला. २० मे रोजी सभापती निवडीसाठी शिंदे यांनी आपले नाव पुढे करत भाजपा आणि शिवसेनेच्या सदस्यांना पाठींबा देण्याची सूचना केली. त्या सुचनेनुसार सोमवारी सभापती निवडीप्रसंगी आपल्या नामनिर्देशन अर्जावर सूचक म्हणून शिवसेनेचे उपसभापती प्रशांत बुद्धिवंत तर अनुमोदन म्हणून भाजपाचे सदस्य बाबासाहेब गांगर्डे यांची स्वाक्षरी होती. एकमेव अर्ज असल्याने आपली बिनविरोध निवड झाली आहे. यापुढे आपण पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुका भाजपामध्ये व सभापती म्हणून कर्जत तालुका पंचायत समितीमध्ये काम करणार आहे. आज रोजी जलसंधारण मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पदभार स्वीकारणार असल्याचे म्हटले. सभापती निवडीच्या दिवशी मी नवीन असल्यान गैरसमज झाला, असेही कदम म्हणाल्या.यावेळी पत्रकार परिषदेत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरिकर, तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, शहराध्यक्ष रामदास हजारे, मनीषा वडे, डॉ.कांचन खेत्रे, अंकुश कदम, रामकिसन साळवे, विक्रम राजेभोसले, विक्रांत ढोकरिकर उपस्थित होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत