शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतला वादळाचा तडाखा, शाळेची पत्रे उडाली, २१ घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 18:41 IST

तालुक्यातील दुरगांव, थेरवडी, धालवडी या परिसरात आज वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कर्जत : तालुक्यातील दुरगांव, थेरवडी, धालवडी या परिसरात आज वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.एक शेतकरी जखमी झाला. गाय व शेळी दगावली. घरावरंची पत्रेही उडाल्याने भिंतीही पडल्या आहे. लाईटचे पोल पडले आहे. दुरगांव शाळेचे मोठे नुकसान झाले. दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. कर्जत तालुक्यातील दुरगांव, थेरवडी, धालवडी या गावांना वादळी वा-याचा मोठा तडाखा बसला. थेरवडी येथे चार घरे पडली यामध्ये रंगनाथ बाबू कांबळे हे जखमी झाले. त्यांचेवर राशीन येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धालवडी येथे किशोर प्रदीप पवार यांची एक गाय व एक शेळी दगावली. आज आलेल्या वादळाचा तडाखा दुरगांवला बसला येथील एकवीस घरे पडली. तसेच येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचे चार वर्गाचे व संपूर्ण पडवीचे पत्रे उडाले. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ग्रामस्थ व शिक्षकांनी डिजिटल बनवली होती. शाळेचे शिक्षक दशरथ देशमुख हे त्यांच्या सहकारी शिक्षकांसह ही घटना समजताच शाळेत आले. शाळेची दुरावस्था पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. वादळाचा जोर एवढा होता की लोखंडी पोल वाकले. सिमेंटचे पोल पडले. भगत पाटील वस्तीवर असणारे रोहीत्र. जनावरांचे गोठे तसेच घरे पडली. फळ बागांचे मोठे नुकसान झाले.दुरगांव येथे २१ घरांची पडझड झाली. एका घरात अवघ्या पंधरा दिवसांची बाळंतीन व बाळ होते. ते घर पडले. शेजारील ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बाळ व बाळंतीन यांना सुखरूप बाहेर काढले. नुकसानीचे पंचनामे करावेत लाभाथीर्ना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी दुरगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच संजीवनी अशोक जायभाय यांनी केली आहे. दुरगांव येथे वादळाचा तडाखा बसला यामध्ये मोठे नुकसान झाले याबाबत सामाजिक कार्यकर्ते अशोक जायभाय यांनी प्रांत अधिकारी अर्चना नष्टे व तहसीलदार वाघ यांना दुर ध्वनीवर संपर्क साधून माहिती दिली. थेरवडी येथे वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी थेरवडीचे सरपंच वसंत कांबळे यांनी केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत