शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

कनोली गावाला ‘केबीसी’चा विळखा

By admin | Updated: July 24, 2014 00:19 IST

रियाज सय्यद/योगेश रातडिया ल्ल संगमनेर महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांची झोप उडवून देणाऱ्या ‘केबीसी’ मल्टीट्रेड कंपनीची पाळेमुळे नगर जिल्ह्यातही रूजली

रियाज सय्यद/योगेश रातडिया ल्ल संगमनेरमहाराष्ट्रातील गुंतवणूकदारांची झोप उडवून देणाऱ्या ‘केबीसी’ मल्टीट्रेड कंपनीची पाळेमुळे नगर जिल्ह्यातही रूजली असून कनोली (ता. संगमनेर) या संपूर्ण गावाची सुमारे ३० कोटींची लुबाडणूक झाल्याचे समोर आले आहे. नाशिकला भाऊसाहेब चव्हाण याने ‘केबीसी’ नावाची कंपनी ‘लाँच’ केली. जवळचे नातेवाईक, मित्र, संबंधातील ‘एजंट’ बनविले. त्यांच्याकरवी सर्वसामान्य लोकांकडून पैसे गोळा करून मुदत ठेवीच्या पावत्या वाटल्या. केवळ तीन महिन्यात पैसे दामदुप्पट करून देण्याच्या अभिनव योजनेला अनेकजण बळी पडले. एजंटांच्या माध्यमातून खेड्या-पाड्यातून ‘केबीसी’त लाखो रुपयांची गुंतवणूक झाली. प्रवरा नदी काठावरील सुमारे ४ हजार ५०० लोकसंख्येचे कनोली गावही ‘केबीसी’च्या फसवेगिरीत अडकले. ऊस, टोमॅटो, वांगी आदी नगदी पिके घेऊन शेतकऱ्यांनी चार पैसे गाठीला बांधले. ४ वर्षांपूर्वी या गावात केबीसीने शिरकाव केला. पैशाच्या मोहापायी अनेकांनी यात गुंतवणूक केली. ‘केबीसी’ कंपनी बुडाली तर आमची जमीन विकून पैसे देवू. २०१४ मध्ये कनोली गावात पैशांचा पाऊस पडणार आहे. पोत्यात भरून पैसे आणू. या एजंटांच्या भूलथापांना बळी पडून ९७ टक्के गाव ‘केबीसी’च्या जाळ्यात अडकले. सुरूवातीला पैसे मिळाले. विश्वासार्हता वाढल्याने कुणी मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले, तर कुणी म्हातारपणाची पुंजी म्हणून ठेवलेले, कुणी जमीन विकून, कुणी सगे-सोयऱ्यांकडून आणून, कुणी दागिने मोडून-तोडून, गहाण ठेवून पैसे ‘केबीसी’त भरले. परंतु आता ‘केबीसी’चे पितळ उघडे पडल्याचे समजताच कनोलीवर आभाळच कोसळले आहे. भरलेले पैसे बुडालेल्या गुंतवणूकदारांचे डोळे पांढरे झाले आहेत. सुनील वर्पे या शेतकऱ्याने एक एकर जमीन विकून ५ लाख ३९ हजार, मंगेश सुदाम वर्पे या शेतकऱ्याने १ लाख ३६ हजार, नोकरदार थॉमस रामचंद्र जगताप यांनी १७ हजार २००, शेतमजूर श्रीकांत रघुनाथ वर्पे यांनी ८६ हजार रुपये अंदाजे १५ ते २० एजंटांद्वारे गुंतविण्यात आले आहेत. (प्रतिनिधी) एजंटाच्या भूलथापांना बळी पडून मी टाकळी (ता.अकोले) येथील एक एकर जमीन विकून ५ लाख ३९ हजार रूपये ‘केबीसी’त भरले. दोन महिन्यांपूर्वी एजंटाने पावत्या घेवून पहिला हप्ता काढून आणला. मात्र पैसे दिलेच नाहीत. फसवणूक करणाऱ्या एजंटाला अटक करा. - सुनील वर्पे, शेतकरी मी ‘केबीसी’त १ लाख ३६ हजार रूपये गुंतविले. आता एजंटाकडे पैशांची मागणी केली तर कंपनी बुडाली, मी काय करू? वाटलं तर मला फाशी द्या, असे तो सांगतो. - मंगेश वर्पे,शेतकरी ‘केबीसी’त फसवणूक झालेल्या सुनील वर्पे यांनी एजंट रामहारी निवृत्ती वर्पे व बाळासाहेब काशिनाथ पोखरकर यांच्याविरूध्द आश्वी पोलिसात तक्रार दिली आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग व वरिष्ठांशी चर्चा करून सबळ पुरावे मिळाल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करू.- सुनील पवार, सहाय्यक निरीक्षक