शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

करंजीत चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 12:31 IST

काल मध्यरात्री करंजी (ता. पाथर्डी ) गावात व परिसरात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकुळ घालून ८ घराचे दरवाज्याच्या कड्या तोडून सोने, मोबाईल व किंमती वस्तू असा लाखो रुपयांचा ऐवज लांबविला. आठ दिवसात पोलिसांनी लावला नाही तर संतप्त ग्रामस्थांनी रस्ता -रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.

करंजी : काल मध्यरात्री करंजी (ता. पाथर्डी ) गावात व परिसरात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकुळ घालून ८ घराचे दरवाज्याच्या कड्या तोडून सोने, मोबाईल व किंमती वस्तू असा लाखो रुपयांचा ऐवज लांबविला. आठ दिवसात पोलिसांनी लावला नाही तर संतप्त ग्रामस्थांनी रस्ता -रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.काल मध्यरात्री १ ते ३ वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी करंजी गावाला लक्ष करित गावातील राजेंद्र दिलीप अकोलकर, जाकीर मणियार, योहान गणपत क्षेत्रे, लिलाबाई क्षेत्रे, म्हातारदेव अकोलकर, गोपिनाथ रामनाथ अकोलकर, भाऊसाहेब क्षेत्रे, संजय मुखेकर यांच्या घराच्या दरवाज्याच्या कड्या तोडून घरातील सामानाची उचका- पाचक घरातील सोन्याचे दागिने, मोबाईल, गळ्यातील मणिमंगळसुत्र, कानातील दागिने आदि लाखो रुपयांचा किंमती ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.नगर - पाथर्डी महामार्गावरील करंजी हे गाव मोठ्या बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखले जाते. येथुन १० किलोमिटर अंतरावर मराठवाड्याची हद्द सुरु होते. येथे असलेल्या औटपोस्टला कायमस्वरूपी पोलिसांची नेमणुक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी अनेक वेळा करूनही याकडे पोलिस खाते जाणून -बुजून दुर्लक्ष करित आहे. गेल्या सहा महिन्यात येथील हॉटेल फोडण्याच्या सत्रानंतर या चो-यांचे लोण गावभर पसरले असल्यामुळे ग्रामस्थात भितीचे वातावरण पसरले आहे. गावात रात्री झालेल्या चो-यांचा तपास पोलिस खात्याने येत्या आठ दिवसात न लावल्यास तसेच येथील औट- पोस्टवर कायमस्वरूपी पोलिसांची नेमणुक न केल्यास ग्रामस्थ तिव्र आंदोलन करतील असा इशारा नवनिवार्चीत सरपंच बाळासाहेब अकोलकर, माजी सभापती अ‍ॅड. मिर्झा मणियार, राजेंद्र क्षेत्रे, सुभाष अकोलकर, श्रीकांत अकोलकर, संतोष अकोलकर, शिवाजी भाकरे, बबनराव अकोलकर, रावसाहेब क्षिरसागर, संपत क्षेत्रे, गोपिनाथ अकोलकरसह अनेक ग्रामस्थांनी दिला आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी