शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

सौरऊर्जेतून कान्हूर पठार विजेत स्वयंपूर्ण

By admin | Updated: October 10, 2016 01:05 IST

विनोद गोळे , पारनेर सौरऊर्जेतून वीजउत्पादन करण्याचा प्रकल्प पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार पतसंस्थेने राबविला असून, यातून संस्था विजेमध्ये स्वयंपूर्ण तर होणारच,

विनोद गोळे , पारनेरसौरऊर्जेतून वीजउत्पादन करण्याचा प्रकल्प पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार पतसंस्थेने राबविला असून, यातून संस्था विजेमध्ये स्वयंपूर्ण तर होणारच, शिवाय पूर्र्णदाबाने वीजपुरवठा आल्यास ही वीज गावालाही पुरविण्यात येणार आहे. पारनेर तालुक्यासारख्या ग्रामीण भागासह राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग समजला जात आहे.कान्हूर पठार येथे कान्हूर पठार मल्टीस्टेट संस्था आहे. राज्यासह परराज्यांतही संस्थेच्या शाखा असून, सर्व शाखांमध्ये चालणार्या आर्थिक व्यवहारांवर आॅनलाईन नियंत्रण कान्हूर पठारमधून केले जाते. त्यामुळे येथे वीजपुरवठा खंडित झाल्यास संस्थेचे राज्यभरातील कामकाज ठप्प होते. त्यात मोठे नुकसान होण्याचा धोका असतो. शिवाय ‘महावितरण’चे वर्षभराचे बिलही लाखाच्या घरात जाते. या सर्व गोष्टींवर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप ठुबे यांनी विचार करताना विजेची गरज व बचत होणे महत्त्वाचे असल्याचे आहे म्हणून सौरऊर्जेचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. सर्व संचालक मंडळानेही यास सहमती दर्शविल्यानंतर प्रत्यक्ष कान्हूर पठार पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीवर सौरऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे समाधान व्यक्त होत आहे. कान्हूर पठार पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीवर सौर उर्जेचे बारा पॅनल बसविण्यात आले आहेत. त्यातून संस्थेला तीन किलोवॅट वीज उपलब्ध होणार आहे. यासाठी अवघा चार ते पाच लाख रूपये खर्च आला आहे. यामुळे संस्था विजेमध्ये स्वयंपूर्ण होणार असून भारनियमनातुन मुक्त होणार आहे. ग्रामीण भागातील हा पहिलाच प्रकल्प असून हा प्रकल्प पाहण्यासाठी अनेक संस्थाचे पदाधिकारी भेटी देण्यास येत आहेत.कान्हूर पठार पतसंस्थेने विजेमध्ये स्वयंपूर्र्ण होण्यासाठी सौर ऊर्जेचा प्रकल्प उभारला आहे. होणाऱ्या वीजनिर्मितीमधून संस्थेचा विजेवरील मोठा खर्च वाचणार आहे. या प्रकल्पातून मिळणारी अतिरिक्त वीज ‘महावितरण’ला विकण्यात येणार आहे. यातूनच ‘महावितरण’ कान्हूर पठार गावाला वीजपुरवठा करू शकते. यामुळे गावालाही या सौर उर्जा प्रकल्पाचा फायदा होणार आहे.-दिलीप ठुबे, मुख्य कार्यकारी अधिकारी, कान्हूरपठार पतसंस्था