शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कळसूबाई शिखर फुलोत्सवाने बहरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 12:08 IST

नवरात्र उत्सवासाठी येणा-या भाविक आणि पर्यटकांबरोबर सुरु झालेल्या फुलोत्सवाने कळसूबाई शिखर बहरून गेले आहे. हिरव्यागार शिखराच्या पायथ्यापासून आता सोनकीच्या पिवळ्या रंगाच्या जोडीला तांबडी, निळी फुले फुलली आहेत. शिखरावर जाणाºया पायवाटेच्या दुतर्फा फुललेली फुले  पर्यटकांचा उत्साह द्विगुणित करत आहेत.

प्रकाश महाले ।  राजूर : नवरात्र उत्सवासाठी येणा-या भाविक आणि पर्यटकांबरोबर सुरु झालेल्या फुलोत्सवाने कळसूबाई शिखर बहरून गेले आहे. हिरव्यागार शिखराच्या पायथ्यापासून आता सोनकीच्या पिवळ्या रंगाच्या जोडीला तांबडी, निळी फुले फुलली आहेत. शिखरावर जाणाºया पायवाटेच्या दुतर्फा फुललेली फुले  पर्यटकांचा उत्साह द्विगुणित करत आहेत.अकोले तालुक्याचा पश्चिम पट्टा पर्यटनाचे आगार म्हणून ओळखले जाते. गियारोहण, दुर्गभ्रमंती, निसर्ग सहली आणि पर्यटनासाठी कळसूबाई, हरिश्चंद्रगड, रतनगड या भागाची वेगळी अशी ओळख आहे. ऋतुमानानुसार येथील निसर्ग बहरतो. वर्षा ऋतूच्या आरंभी सुरू होणारा काजवा उत्सव, त्यानंतरचा जलोत्सव आणि नवरात्राच्या आरंभी सुरू होणारा फुलोत्सव नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतो.  सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे. हा उत्सव सुरु होण्यापूर्वीच फुलोत्सव सुरू झाला. सह्याद्रीच्या पर्वत रांगांतील सर्वच गड, शिखरे, छोटे मोठे पर्वत पायथ्यापासून ते शिखरापर्यंत सोनकीच्या पिवळ्या धम्मक फुलांबरोबर विविध रानफुलांनी बहरून गेले आहेत. कुठे खडकात तर कुठे दगड धोंड्यांतून डोकावणारे रानफुले भुरळ घालत आहेत. या सर्वच फुलांनी संपूर्ण शिखर फुलले आहे. नवरात्रौत्सवामुळे कळसूबाई शिखरावर भाविकांची भल्या पहाटेपासून रीघ सुरु आहे.  दुसºया माळेपासून भाविकांची गर्दी वाढली. ही गर्दी दस-यापर्यंत राहणार आहे. भाविकांबरोबर राज्यातील गिर्यारोहक, पर्यटकांचीही गर्दी आहे.  पाऊस झाल्याने निसर्गातील तजेला अद्यापही टिकून आहे.

टॅग्स :AkoleअकोलेAhmednagarअहमदनगर