शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अडीच कोटी खर्चाच्या पुणतांबा-शिंगवे रोडला आठ महिन्यातच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 17:41 IST

मार्च २०१८ महिन्यात जवळपास २.५० कोटी रुपये खर्च कोपरगाव-श्रीरामपूर या राज्यमार्ग ३६ वर येणाऱ्या पुणतांबा फाटा ते शिंगवे या अंदाजे आठ किलोमीटर रस्त्याचे सुधारणा व दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. परंतु सध्यस्थितीत हा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे.

कोपरगाव : मार्च २०१८ महिन्यात जवळपास २.५० कोटी रुपये खर्च कोपरगाव-श्रीरामपूर या राज्यमार्ग ३६ वर येणाऱ्या पुणतांबा फाटा ते शिंगवे या अंदाजे आठ किलोमीटर रस्त्याचे सुधारणा व दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. परंतु सध्यस्थितीत हा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. यासंदर्भात संबंधित विभागाकडे ग्रामस्थांनी तक्रारही केली. वर्तमानपत्रात वृतही प्रसिद्ध झाले. अद्यापपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती झाली नसल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.या रस्त्याची कोपरगाव सार्वजनिक बांधकाम उपविभाग माधमातून देखभाल दुरुस्तीचे काम केले जाते. सदर रस्त्याचे मागील मार्च महिन्याच्या शेवटी २.५० कोटी खर्च करुन डांबरीकरण करण्यात आले. परंतु सदर काम हे निकृष्ट दर्जाचे झाले. विशेष म्हणजे या रस्त्याचे काम सुरु असताना परिसरातील ग्रामस्थांनी याचे चित्रीकरण करून सोशल मीडियावरही टाकले होते. या रस्त्याच्या निवीदेमध्ये काम केल्यानंतर पुढील दोन वर्षाच्या देखभाल दुरुस्तीची तरतूद आहे. परंतु रस्त्याचे काम झाल्यापासूनच पडलेल्या खड्ड्यांची आठ महिने उलटूनही दुरुस्ती होत नसल्याने संबंधित ठेकेदार व बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.या रस्त्याच्या कामासंदर्भात ‘लोकमत’ने दूरध्वनीवरुन संपर्कसाधण्याचा प्रयत्न केला असता संबंधित अधिका-यांनी प्रतिसाद दिला नाही.

या खड्ड्यांचे काय?

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान राज्यातील रस्त्यासंदर्भात सांगितले होते की, येत्या काळात राज्यातील सर्वच रस्त्याची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे सेल्फी काढणा-यांना खड्डेच सापडणार नाहीत. परंतु कोपरगाव तालुक्यात आठ महिन्यापूर्वीच आठ किलोमीटर डांबरीकरण झालेल्या या रस्त्याच्या खड्ड्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावShrirampurश्रीरामपूर