शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

को-२३८ उसाचे वाण महाराष्ट्रात नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 16:16 IST

गाजावाजा करून सोशल मीडियावर फोकसमध्ये प्रसिध्दीच्या झोतात आलेल्या ‘को-२३८’ या ऊसाच्या वाणाचा फज्जा उडाला आहे.

भाऊसाहेब येवलेराहुरी : गाजावाजा करून सोशल मीडियावर फोकसमध्ये प्रसिध्दीच्या झोतात आलेल्या ‘को-२३८’ या ऊसाच्या वाणाचा फज्जा उडाला आहे. एकरी दोनशे टन उत्पादन, वीस उतारा, लवकर उंच वाढणारी म्हणून राज्याच्या विविध भागात घेण्यात आलेल्या चाचण्यात वाण टिकाव धरू शकला नाही. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ऊस विशेषज्ज्ञ डॉ़आनंद सोळंकी यांनीही या वाणाला लाल कंदील दाखविला आहे.उत्तर प्रदेश, तामीळनाडू, मध्यप्रदेश, हरियाणा या राज्यात को-२३८ या वाणाची शिफारस करण्यात आली होती. उंच वाढलेले उसाचे फोटो व्हॉटस् अ‍ॅपवर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बेण्याची मागणी केली. मात्र अल्प शेतक-यांनाच बेणे उपलब्ध झाले. भेंडा, समर्थ, संजीवनी, घोडगंगा आदी ठिकाणी साखर कारखान्यांच्या माध्यमातून को-२३८ वाणाच्या गेल्यावर्षी चाचण्या घेण्यात आल्या. महाराष्ट्र व उत्तर भारतातील हवामान यामध्ये फरक असल्याने महाराष्ट्रातील शेतक-यांनी लागवड करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.राहुरी येथील महात्मा फु ले कृषी विद्यापीठातील ऊस विशेषज्ज्ञ डॉ़आनंद सोळंकी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले, को-३३८ उसाच्या वाणासंदर्भात शेतक-यांशी विद्यापीठाने संपर्क साधला. उत्तर भारतात थंड हवामान व जमीन व महाराष्ट्रातील उष्ण हवामान व जमिनीतील फरक यामुळे राज्यातील शेतक-यांनी लागवड करू नये, असे सूचविण्यात आले आहे. या वाणाला लवकर तुरे येतात. उतारा मिळत नाही. कांड्यांची संख्या १८ ते २० राहते. त्यामुळे शेतक-यांनी राज्यात येणा-या व मान्यता असलेल्या उसाची लागवड करावी, असे सुचविण्यात आले आहे.ऊस प्रजनन केंद्र कोईमतूर (तामीळनाडू) यांच्या माध्यमातून व व्हीएसआय पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर साखर कारखान्याने को-२३८ या वाणाची मल्टी लोकेशन चाचणी नुकतीच पूर्ण केली असल्याची माहिती मंगेश नवले यांनी दिली. चाचणीमध्ये आपले हवामान व जमिनीवर या वाणाची लागवड करणे शक्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.चाचणीतून बाहेर आलेले गुणधर्ममहाराष्ट्रात ८ ते १० महिन्यात फुलोरा येतो़ अकरा महिन्यात पूर्ण प्लॉटला फुलोरा येतो.राज्यातील जमिनीवर उसाची जाडी मिळत नाही. त्यामुळे उत्पादनात घट होते. तीव्र उन्हामुळे खोड किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. फुलो-यामुळे ऊस २० कांड्याच्या पुढे वाढ होत नाही.उतारा साडेअकरा आला.फुटवे व उगवण क्षमतेत फे ल झाली.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी