ससेवाडी येथील टिपर तलाव फुटला असून त्यामुळे सीना नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली होती. तर बहिरवाडी येथील गव्हाळी वस्तीवरील तलाव फुटण्याची शक्यता निर्माण झाली असता प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, सरपंच अंजना येवले व राजेंद्र दारकुंडे यांनी नागरिकांच्या मदतीने सांडवा खोल करून पाणी काढून दिल्याने मोठा अनर्थ टळला.
.........
पहिल्याच पावसात सर्व तलाव तुडुंब
जेऊर परिसरातील डोणी तलाव, बहिरवाडी येथील वाकी तलाव, शेटे वस्ती तलाव, इमामपूर येथील पालखी तलाव तसेच सर्व बंधारे पहिल्याच पावसात तुडुंब भरले आहेत. परिसरातील सर्व नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून पहिल्याच पावसात नद्या, नाले, बंधारे, तलाव भरण्याची ही पहिलीच वेळ आहे.
..............
तालुक्यात ७ मंडलात अतिवृष्टी
नगर तालुक्यातील नालेगाव, सावेडी, कापुरवाडी, भिंगार, नागापूर, जेऊर, चिंचोंडी पाटील या ७ मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या पावसाची आकडेवारी अशी : नालेगाव-७४ , सावेडी-८२ , कापुरवाडी-८२.५ , केडगाव-४६. ८, भिंगार-११९.३ , नागापूर-७८, जेऊर-७१ , चिंचोडी पाटील-७६.५, वाळकी-४२.३ , चास-५४.८ , रुई छत्तीशी-४३.
फोटो