शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

दिल्लीच्या व्यापा-याला लुटणारे लुटारू नागापूर येथून जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 17:30 IST

व्यापा-याचे अपहरण करून मारहाण करत त्यांच्याकडील २२ हजार रुपये लुटणा-या दोघा लुटारूंना मंगळवारी सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या पथकाने नागापूर येथून जेरबंद केले.

अहमदनगर : व्यापा-याचे अपहरण करून मारहाण करत त्यांच्याकडील २२ हजार रुपये लुटणा-या दोघा लुटारूंना मंगळवारी सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या पथकाने नागापूर येथून जेरबंद केले.स्वप्नील पोपट परभत (वय २१) व दिनेश सुरेश खैरनार (वय ३३ रा. दोघे नवनागापूर, नगर) अशी आरोपींची नावे आहेत़ दिल्ली येथील व्यापारी अनिल विजयपाल तिवारी हे कामानिमित्त नगर येथे आले होते. माळीवाडा परिसरातील ते आनंद लॉज येथे राहात होते. तिवारी हे लॉज परिसरात असताना २३ मार्च रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास दोन अनोळखी इसम त्यांना भेटले. आमच्या साहेबांना वेल्डिंगच्या कामाची आॅर्डर द्यावयाची आहे. यासाठी तुम्हाला आमच्या बरोबर यावे लागेल, असे सांगून तिवारी यांना या दोघांनी दुचाकीवर बसवून एमआयडीसी परिसरातील निर्जन ठिकाणी नेले. तेथे गेल्यानंतर दोघांनी तिवारी यांना मारहाण करत त्यांच्याकडील १२ हजार रुपये रोख व एक मोबाईल असा २२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी तिवारी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. ही चोरी नागापूर येथील दोघांनी केली असल्याची माहिती शिंदे यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक अभय परमार, सहायक निरीक्षक शिवाजी नागवे, कॉन्स्टेबल अभिजित अरकर, नितीन शिंदे, ज्योती काळे, रिंकी माढेकर, गाडगे, गव्हारे यांच्या पथकाने आरोपींना नागापूर येथून जेरबंद केले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस