शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

जामखेड-श्रीगोंदा रस्ता बनला अपघातसाखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 15:20 IST

तालुक्यातील अरणगाव परिसरातून जाणाऱ्या जामखेड-श्रीगोंदा या मार्गावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे धोकादायक बनला आहे.

सत्तार शेखहळगाव : तालुक्यातील अरणगाव परिसरातून जाणाऱ्या जामखेड-श्रीगोंदा या मार्गावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे धोकादायक बनला आहे. सातत्याने होणा-या अपघातांमुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याची बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती हाती घेण्याची मागणी वाहनधारकांसह जनतेतून होत आहे.पश्चिम महाराष्ट्राला मराठवाड्याशी जोडणाºया मुख्य रस्त्यांपैकी जामखेड-श्रीगोंदा हा प्रमुख रस्ता आहे. हा रस्ता दुपदरी करण्याची अनेक वर्षांची मागणी सरकारी दरबारी प्रलंबित आहे. निवडणूक काळातही हा मुद्दा चर्चेत असतो. पण नंतर हा प्रश्न बासनात गुंडाळून ठेवला जातो. या कर्जत-जामखेडचे प्रतिनिधीत्व करणारे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून या रस्त्याचा प्रश्न निकाली निघण्याची आशा या भागात निर्माण झाली होती. त्यानुसार हा रस्ता केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग म्हणून या रस्त्याचे काम अजूनपर्यंत होऊ शकलेले नाही.जामखेड तालुक्यातील पाटोदा-अरणगाव या भागातून जाणाºया जामखेड-श्रीगोंदा या मार्गाची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाली आहे. एका ठिकाणी तर रस्त्याच्या मधोमध अक्षरश: तीन फुटांपेक्षा मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय रत्नापूर फाटा ते अरणगावपर्यंत रस्त्याला साईडपट्टीच दिसत नाही. साईडपट्टीचा भाग दोन दोन फुटांच्या खड्ड्यांनी व्यापला आहे. साईडपट्टीला असलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक आपली वाहने रस्त्याच्या कडेला घेत नाहीत. यातूनच वाहनधारकांमध्ये हमरीतुमरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. या रस्त्यावर रात्रीच्या वेळी प्रवास करणाºया वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावरून प्रवास करणाºया प्रवाशांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. कंबरदुखी, मानदुखीने अनेक प्रवाशी हैराण झाले आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने तातडीने रस्ता दुरूस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर