शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त अभियान हीच सर्वोच्च प्राथमिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 19:48 IST

जिल्हा मोठा असल्याने येथील प्रश्न समजावून घेऊन आणि गावपातळीवर थेट संपर्क ठेवून विकास योजना जलदगतीने मार्गी लावण्यावर आपला भर राहिल. जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आपला प्राधान्यक्रम राहिल, असा मनोदय नूतन जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी आज व्यक्त केला.

ठळक मुद्देद्विवेदी यांनी जिल्हाधिकारीपदाची सुत्रे स्वीकारली अधिकाऱ्यांसह पहिलीच बैठक

अहमदनगर : जिल्हा मोठा असल्याने येथील प्रश्न समजावून घेऊन आणि गावपातळीवर थेट संपर्क ठेवून विकास योजना जलदगतीने मार्गी लावण्यावर आपला भर राहिल. जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आपला प्राधान्यक्रम राहिल, असा मनोदय नूतन जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी आज व्यक्त केला.प्रभारी जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्याकडून द्विवेदी यांनी पदाची सुत्रे स्वीकारली. त्यानंतर लगेचच त्यांनी महसूल अधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत सकारात्मक संवाद साधत द्विवेदी यांनी अधिका-यांकडून जिल्ह्याविषयी माहिती घेतली.जिल्हा आकारमानाने मोठा असल्याने प्रत्येकाशी समन्वय ठेवून वेगाने काम मार्गी लावण्यावर आपला भर राहणार आहे. त्यादृष्टीने गावपातळीवर काम करणा-या शासकीय घटकांशी थेट संपर्क ठेवून तेथील कामे जलदगतीने मार्गी लागतील, यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी अधिका-यांना दिला.शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व घटकांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने असा समन्वय प्रस्थापित करण्यावर आपला भर राहिल, असेही त्यांनी सांगितले़ यावेळी अपर जिल्हाधिकारी पालवे, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, वामनराव कदम, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, जिल्हा नियोजन अधिकारी एन. एस. भदाणे, तहसीलदार आप्पासाहेब शिंदे, गणेश मरकड, शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcollectorजिल्हाधिकारी