शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यातून जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 15:23 IST

जायकवाडीला पाणी सोडण्यास नगर जिल्ह्यातून होणारा तीव्र विरोध, अशा स्थितीत परिस्थिती चिघळली तर अपुरा असलेला पोलीस बंदोबस्त व पाण्याबाबत न्यायालयात दाखल झालेल्या याचिका या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे.

अहमदनगर : जायकवाडीला पाणी सोडण्यास नगर जिल्ह्यातून होणारा तीव्र विरोध, अशा स्थितीत परिस्थिती चिघळली तर अपुरा असलेला पोलीस बंदोबस्त व पाण्याबाबत न्यायालयात दाखल झालेल्या याचिका या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे.समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी महामंडळाने जलसंपदा विभागाला दिला आहे. परंतु त्यानंतर नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर आंदोलनास सुरूवात झाली. अकोले तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी जायकवाडीस पाणी सोडल्यास आपण प्रवरा पात्रात जलसमाधी घेऊ, असा इशारा दिला असून प्रवरा नदीवरील पुलावर त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. ही स्थिती हाताळण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त आवश्यक आहे.त्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभाग, पोलीस यंत्रणा यांची जिल्हाधिकाऱ्यांसमवेत सोमवारी सकाळी बैठक झाली. ही सर्व स्थिती पाहता जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर पडला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व पाटबंधारे विभाग यांच्याकडून यास दुजोरा देण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJayakwadi Damजायकवाडी धरण