मंगल कलशचा मान कैलास ठोळे, सुभषचद काले, विजय गंगवाल या परिवारास मिळाला़ यावेळी बोलताना रविनंदीजी महाराज यांनी चातुर्मासानिमित्त प्रबोधनपर प्रवचन केले. या कार्यक्रमप्रसंगी श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डी, नाशिक परिसरातील जैन भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त महाप्रसाद ज्येष्ठ पत्रकार व लोकमतचे वितरक बी. के. पाटणी परिवाराच्या वतीने देण्यात आला़ यावेळी शिर्डी येथील उद्योजक अशोक गंगवाल, किशोर गंगवाल, महामंत्री राजाभाऊ पाटणी, अशोक पाटणी, संतोष झांजरी, सुरजमल गंगवाल, प्रेमाबाई बज, शिखरचंद कासलीवाल, राजेंद्र अजमेरा अशोक गंगवाल, राजेंद्र गंगवाल, पवन सेठी, उद्योगपती कैलास ठोळे, फुलचंद पांडे, शोभा ठोळे, आनंद पहाडे, सतीश गंगवाल, सुधा ठोळे, विनोद गंगवाल, संजय पापडीवाल, प्रमोद कासलीवाल, पत्रकार किशोर पाटणी उपस्थित होते. भूपेंद्र मिश्रा यांनी आभार मानल़े
साईनगरीलगत असलेल्या ज्ञानतीर्थावर जैन चातुर्मासारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:20 IST