शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी महिलांचा घरोघर जात देवीचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 16:38 IST

आपल्या गावची प्रथा सांभाळत अकोले तालुक्यातील शिंगणवाडी येथील महिला आपल्या आदिवासी भाषेतील देवीची गाणे गात देवीचा जागर करत आहेत.

राजूर : आपल्या गावची प्रथा सांभाळत अकोले तालुक्यातील शिंगणवाडी येथील महिला आपल्या आदिवासी भाषेतील देवीची गाणे गात देवीचा जागर करत आहेत.याबाबत या महिलांशी सवांद साधला असता त्यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून आमच्या गावातील महिला नवरात्रात घरोघर जात देवीची गाणी गातात. ही परंपरा कायम ठेवली असून आम्ही दोन दिवसांपासून खेड्यापाड्यात फिरत आहोत. याची सुरुवात आम्ही रंधा येथील घोरपडा आईच्या दर्शनाने केली. यानंतर परिसरातील गावांमध्ये आम्ही घरोघर फिरत देवीची गाणे गात आहोत. खेड्यातील लोक आम्हाला या बदल्यात धान्य देतात. राजूरकर आम्हाला देवीच्या नावाने थोडीफार देणगी देतात. जमा होणाºया धान्याचा व पैशाचा आम्ही दस-याच्या दिवशी शिंगणवाडी येथील आमच्या देवीच्या मंदिरासमोर स्वयंपाक करुन देवीला नैवद्य दाखवतो. गावकरी यात सहभागी होतात, असे लक्ष्मी पोकळे, बुगाबाई गांगड, सुमती पोकळे, जया पोकळे या आदिवासी महिलांनी सांगितले. प्रवासासाठी गावातीलच अनिल सोनवणे यांच्या वाहनांची मदत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.काठ्यांच्या तालावर धरतात फेरसकाळीच आपल्या गावातून या बारा आदिवासी महिला घराबाहेर पडतात. हातात दोन लाकडी काठ्या घेत या काठ्यांच्या तालावर फेर धरून आदिवासी भाषेतील देवीची गाणी त्या सादर करतात. त्यांची ही गीते ऐकून नागरिक त्यांना स्वखुशीने देणगी किंवा धान्य देत असतात. याबाबत त्या कोणालाही सक्ती करीत नाहीत, हे त्यांचे एक वैशिष्ट्य आहे.