शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी जाधव?

By admin | Updated: September 1, 2014 00:00 IST

शिर्डी : तब्बल एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर संस्थानच्या कार्यकारी अधिकारी पदी राज्य शासनाने राजेंद्र जाधव यांची नियुक्ती केल्याचे वृत्त आहे़

शिर्डी : तब्बल एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर संस्थानच्या कार्यकारी अधिकारी पदी राज्य शासनाने राजेंद्र जाधव यांची नियुक्ती केल्याचे वृत्त आहे़ मंत्रालयात अंडर सेक्रेटरी म्हणून कार्यरत असलेले जाधव हे अपर जिल्हाधिकारी दर्जाचे असून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात येते़वार्षिक पाचशे कोटीपर्यंत उलाढाल असलेल्या साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी पद गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे़ शिर्डीच्या प्रांताधिकाऱ्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे़ किशोर मोरे यांच्या बदलीनंतर काही महिने हा कार्यभार उपकार्यकारी अधिकारी यांच्याकडे होता़ त्यानंतर अजय मोरे यांच्याकडे व त्यांच्या बदलीनंतर आता ही जबाबदारी आता कुंदन सोनवणे यांच्याकडे आहे़ दरम्यान साईबाबा संस्थानचा वाढता व्याप लक्षात घेता संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी यासाठी येथील भाजपाचे शहराध्यक्ष राजेंद्र जगताप, माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप कुलकर्णी, संजय काळे आदींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती़ त्यावर न्यायालयाने शासनाला पंचेचाळीस दिवसात आयएएस अधिकारी नेमण्याचे आदेश दिले होते़ त्यास जवळपास शंभर दिवस उलटले असून राज्य सरकारने या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे़ न्यायालयाने नुकतीच याचीकाकर्त्यांना नोटीस बजावून आपले म्हणणे चार आठवड्यात मांडण्यास सांगितले आहे़दरम्यान शासनाने निवडणूक आचारसंहिता सुरु होण्याच्या तोंडावर जाधव यांच्या नियुक्तीचे आदेश काढल्याचे वृत्त आहे़ याशिवाय संस्थानचे विश्वस्त मंडळही नेमणुकीच्या प्रतीक्षेत असून गेल्या अडीच वर्षापासून जिल्हा प्रधान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समिती संस्थानचा कारभार पहात आहे़ (तालुका प्रतिनिधी)