शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

इवल्याशा हातांनी सावरला 'त्यांचा' फाटका संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 15:58 IST

फक्त आठ गुंठे जमीन.. त्यात दुष्काळ पाचवीला पूजलेला.. पोटी मूलबाळ नाही. कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी तीन-चार शेळ्या व एक गावरान गाय. आपले म्हणणारे जवळपास कोणीच नसल्याने एकमेकांच्या सुखदु:खात एकमेकांना आधार देणारे शंकर सोनू जाधव.

योगेश गुंडअहमदनगर : फक्त आठ गुंठे जमीन.. त्यात दुष्काळ पाचवीला पूजलेला.. पोटी मूलबाळ नाही. कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी तीन-चार शेळ्या व एक गावरान गाय. आपले म्हणणारे जवळपास कोणीच नसल्याने एकमेकांच्या सुखदु:खात एकमेकांना आधार देणारे शंकर सोनू जाधव.गावात ते आप्पा या नावानेच परिचित. आप्पा व त्यांची पत्नी मोठ्याईचे चास येथील जि.प. वस्ती शाळेजवळ रहाणारे  छोटेखानी कुटुंब. पण सुखी संसारात विघ्नांचे विरजण न पडल्यास ती नियती कसली. अशातच उदरनिर्वाहाचे एकमेव  साधन असलेल्या आप्पांच्या शेळ्या चोरीला जातात अन आप्पांवर संकटांचा डोंगर कोसळला. उदरनिर्वाहाचे मुख्य साधन चोरीला गेल्यामुळे कुटुंब चालायचे कसे,  खायचे काय  हा यक्षप्रश्न आप्पांना पडला. आप्पा शाळेच्या शेजारीच रहायला असल्याने  बोलताबोलता चोरीची घटना वाºयासारखी विद्यार्थ्यांमार्फ त शाळेतील शिक्षक बी. के. बनकर यांच्यापर्यंत गेली. शिक्षकी बाण्यातील मनाची संवेदनशीलता दाखवत बनकर गुरूजींनी आप्पांची आपुलकीने विचारपूस केली. विद्यालयातील शिक्षक बनकर यांनी शाळा व विद्यार्थ्यांना हाताशी धरत आप्पांप्रती काही तरी उतराई होण्याचे ठरवले. यासाठी निरागस चिमुकल्यांनीही मदतीचे हात पुढे केले. कुणी आठवाभर, कुणी अदुलीभर तर कुणी पायलीभर धान्य आप्पांसाठी आणले. चिमुकल्यांचा हा उत्साह पाहून शाळेतील शिक्षकांनीही त्यांना किराणा सामान आणले.  दुसºया दिवशी आप्पांना बोलावून त्यांना ही मदत देण्यात आली. निरागस इवल्याशा हातांची मदत पाहून आप्पांचे डोळे पाणावले. थरथरत्या हातांनी ती मदत आपल्या ओंजळीत घेताना कुटुंब गहिवरले. चोरीमुळे खायचे वांधे झालेले आप्पांचे  कुटुंब विद्यार्थ्यांच्या, शाळेच्या मदतीमुळे सावरले. बालमनाला एक चांगला व संस्कारक्षम अनुभव शिक्षक बनकर व शिक्षिका रंजना चेमटे यांना मिळाला. शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर व शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी शाळा व मुलांच्या सहृदयतेचे कौतुक केले .दुष्काळात चोरी झाली. चोरांनी पण चोरी कुणाची करावी आम्हा गरिबांची. वस्तीवर राहायला आहे. बायकोला चालता येत नाही. त्यामुळे सर्व कामे मलाच या वयात करावी लागतात, कुणीही आधार नाही. मुलांची मदत लाखमोलाची आहे, असे शंकर सोनू जाधव यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी