कोपरगाव : शहरातील मुख्य रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाल्याने महाविकास आघाडीचे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आणि मनसेच्यावतीने मुरूम टाकून रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्याच्या कामांना विरोध करणाऱ्या कोल्हे गटाच्या नगरसेवकांचा हातात फलक घेऊन शनिवारी (दि.११) निषेध केला होता. यावेळी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील व मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मात्र, हे आंदोलन करताना कोरोना घटना व्यवस्थापक यांची परवानगी व शासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता, कोविड नियमांचे, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी १३८ जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला, असल्याची माहिती सोमवारी (दि. १३) शहर पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार राम खारतोडे यांनी सुनील वसंतराव गंगुले, मंदार सुभाष पहाडे, अनिल शिवाजी गायकवाड, सुनील जनार्धन फंड, गणेश आबादास लकारे, भरत आसाराम मोरे, तुषार संजय पोटे, नवाज वहाब कुरेशी, कलविंदर हरितसिंग डडीयाल, निखिल नंदकुमार डांगे, एकनाथ ऊर्फ बाल्या कैलास गंगुले, विरेन ज्ञानदेव बोरावके, ऋषिकेश सुनील खैरनार, राजेंद्र शंकरराव वाकचौरे, संदीप सावळेराम पगारे, संदीप शरद कपिले, विकास श्रीराम शर्मा, चंद्रशेखर सुधाकर म्हस्के, सुनील आसाराम साळुके, गगन पंडू हाडा, अजित मोहीद्दीन शेख, राहुल विजयकुमार देशपांडे, बाळासाहेब पिराजी साळुंके, फकीर महंम्मद कुरेशी, कार्तिक सरदार, शुभम ठकाजी लसुरे, धनंजय कांतीभाई कहार, अक्षय मिनीनाथ आग्रे, योगेश कांतीलाल गंगवाल, दिनेश मधुकर पवार, राहुल बाळकृष्ण देवळालीकर, संदीप सुरेश देवळालीकर, अशोक गंगाधर आव्हाटे, सुनील वामन शिलेदार, महेश रवींद्र उदावंत, रावसाहेब चंदू साठे, विजय प्रभाकर त्रिभुवन, इम्तीयाज रफिक पठाण (रा. कोपरगाव) व इतर अंदाजे १०० अशा एकूण १३८ राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आय आणि मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार संजय पवार हे करीत आहे.