शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्हा कधी कोरोनामुक्त होईल याची तारीख सांगणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 11:59 IST

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा हा एक जून रोजी कोरोनामुक्त होईल, अशी घोषणा ३१ मे रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीम यांनी केली होती. मात्र त्यानंतर जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे प्रमाण वाढत गेले. तसेच मृत्यू झालेल्यांची संख्याही वाढतच गेली.

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा हा एक जून रोजी कोरोनामुक्त होईल, अशी घोषणा ३१ मे रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीम यांनी केली होती. मात्र त्यानंतर जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे प्रमाण वाढत गेले. तसेच मृत्यू झालेल्यांची संख्याही वाढतच गेली. कोरोनामुक्त होण्याऐवजी जिल्ह्याचा आकडा सव्वा दोनशेच्या पुढे सरकला. त्यामुळे जिल्हा कधी कोरोनामुक्त होईल, याचा मुहुर्त सांगणे कठीण आहे, अशी कबुली पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. त्यांचे हे वाक्य ऐकून जिल्हाधिकाºयांसह उपस्थित अधिकाºयांची चिंता वाढली.पालकमंत्री मुश्रिफ यांनी आपणच केलेल्या घोषणेची आठवण झाली. पत्रकारांनी प्रश्न विचारण्यापूर्वीच त्यांनी हा खुलासा सुरवातीलाच करून टाकला. लॉकडाऊन उघडल्यानंतर रस्त्यावर मोठी गर्दी होते आहे. भाजीपाला खरेदीसाठी लोकांची उडी पडते आहे. काही लोक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसते आहे. ही सर्व परिस्थितीचे मुश्रीफ यांनी अवलोकन केले असावे. म्हणून तेही हतबल झाल्याचे पहायला मिळाले.जिल्हा एक जून रोजी कोरोनामुक्त होईल, अशी घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील आकडा दोनशेपार गेला. अधिकाºयांनी प्रयत्न केले, मात्र त्याला दृष्ट लागली. लोक बाहेरून येत राहिले आणि कोरोनाची संख्या वाढत गेली. जिल्ह्यातील परिस्थिती पाहता आता तारीख सांगणे अवघड आहे. मात्र लवकरात लवकर जिल्हा कोरोनामुक्त होईल, हे आता सांगतो, असे मुश्रीफ म्हणाले.जिल्ह्यात आतापर्यंत २३२ जण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यातील १६१ जण घरी परतले आहेत. मृत्यू झाले हे दुर्दैव आहे. आता येथून पुढे एकही मृत्यू होणार नाही, याची प्रशासनाला काळजी घ्यायची आहे.  कोणाला लक्षणे नसतील तर तपासणीची गरज नाही. मात्र ज्यांना लक्षणे आहेत, त्यांनी तपासणी करून घेणे गरजेचे आहे. परगावाहून आलेल्या ३३ हजार २९९ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. आता फक्त ६ हजार ९६३ जण क्वारंटाईन आहेत. लस मिळेपर्यंत स्थिती पूर्ववत होईल की नाही, हे सांगणे कठीण आहे.जे गोरगरीब आहेत, त्यांना धान्य देण्याची योजना सरकारने आणली आहे. महिनाभरात त्यांना धान्य दिले जाईल. कधी डाळ, तर कधी  चणा देण्याचे काम सुरू होईल, रेशनकार्ड ज्यांना नाही, अशानांही धान्य देण्याचे नियोजन आहे.----------प्रशासनात समन्वयाचा अभावसंगमनेरमध्ये दोन दिवसांपूर्वी कोरोनाने तीन महिलांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनाने तीन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मात्र जिल्हा प्रशासनाकडून दोन महिलांची मृत्यू झाल्याची माहिती दिली जात होती. अशावेळी संभ्रम तयार होतो. याबाबत प्रशासनाचा असमन्वय दिसतो, असे पत्रकारांनी छेडल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्वत: पुढे येत उत्तर दिले. तिसरी महिला थेट मुंबई येथून जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. त्यामुळे त्या महिलेचे रेकॉर्ड तयार करण्याचे काम सुरू होते, त्यामुळे तीनच महिलांची माहिती दिली जात होती, असे सांगितले.