शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तुंबलेल्या गटारीत पडून इसमाचा मृत्यू, पालिकेविरूद्ध परिसरातील नागरिकांचा रोष

By सचिन धर्मापुरीकर | Updated: October 3, 2023 15:53 IST

Ahmednagar: रात्री साडेनऊच्या सुमारास हनुमान नगर येथून जाणाऱ्या सचिन गहीनाथ गजर (वय ३६, रा. सर्व्हे नंबर १०५, कोपरगाव) या तरूणाच्या गटार लक्षात आली नाही. यात पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

- सचिन धर्मापुरीकरकोपरगाव (जि. अहमदनगर) : सोमवारी रात्री सात वाजल्यापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी आणि गटारी तुंबल्या होत्या. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास हनुमान नगर येथून जाणाऱ्या सचिन गहीनाथ गजर (वय ३६, रा. सर्व्हे नंबर १०५, कोपरगाव) या तरूणाच्या गटार लक्षात आली नाही. यात पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. नगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील हनुमान नगर येथील रहिवासी सचिन गहना गजर हा रोजंदारीवर काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होता. सोमवारी काेपरगाव शहरात मुसळधार पाऊस होत होता. रस्त्यांवर पाणी साचलेले होते. गटारी तुंबल्या होत्या. यावेळी हनुमान नगर येथून कीराणा सामान घेवून घरी जात असताना उघड्या गटारीचा अंदाज न आल्याने सचिन त्यात पडला. परिसरातील काही लोकांना गटारीत पाय दिसून आले. नागरिकांनी सचिनला तात्काळ बाहेर काढून ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र तेथे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषीत केले.

गेल्या दोन वर्षापासून हनुमान नगर येथील गटारीचे काम रखडलेले आहे. याच गटारीत पडून सचिनचा मृत्यू झाला, यास पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा रोष स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला.सचिन गजर यांची परिस्थिती हालाखीची असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.

मुख्याधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करा; सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची मागणीसचिन गजर यांच्या मृत्यूस पालिका प्रशासन व संबंधित कामाचा ठेकेदार जबादार असून मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याविरूद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कार्यकर्ते मंगळवारी दुपारी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात जमा झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख व कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या उपस्थतीत झालेल्या बैठकीत मयत सचिन गजर यांच्या कुटूंबियांना दहा लाख रूपयांची मदत करावी व त्यांच्या पत्नीस पालिकेत नोकरी देण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी पराग संधान, कैलास जाधव, एकलव्य संघटनेचे तालुका अध्यक्ष उत्तम पवार, मंगेश औताडे, जितेंद्र रणशुर, राजेंद्र सोनवणे, केशव भवर, दत्ता काले, अशोक लकारे, बबलू वाणी, सनी वाघ, असलम शेख, सोमनाथ म्हस्के, जावेद पठाण, पप्पू पठाण आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर