शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

जवखेडे हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे सोपवावा

By admin | Updated: November 15, 2014 23:38 IST

अहमदनगर : जवखेडे येथील हत्याकांड माणूस नव्हे तर सैतानच करू शकतो. हत्याकांडाचा तपास करण्यास पोलीस यंत्रणेला सपशेल अपयश आले आहे.

अहमदनगर : जवखेडे येथील हत्याकांड माणूस नव्हे तर सैतानच करू शकतो. हत्याकांडाचा तपास करण्यास पोलीस यंत्रणेला सपशेल अपयश आले आहे. त्यामुळे या हत्याकांडाचा तपास ‘सीबीआय’कडे सोपवावा, अशी मागणी ‘एमआयएम’चे नेते व खासदार असुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.ओवेसी यांनी शनिवारी सकाळी पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे भेट देऊन जाधव कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर नगर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, जवखेडे हत्याकांड अत्यंत क्रुर पद्धतीने करण्यात आले आहे. दलित कुटुंबियांची अशी निर्घुण हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. २१ दिवस झाले तरी पोलिसांना अद्याप आरोपी सापडले नाहीत, हे दुर्दैव आहे. मागास समाजातील दलित, मुस्लीम समाजातील लोकांच्या हत्या झाल्या की पोलिसांना आरोपी सापडत नाहीत, हे असे का होते? आरोपी कोण आहेत, हे पोलिसांना चांगले माहिती आहे. मात्र ते त्यांना अटक करीत नाहीत. यासाठी पोलिसांवर विसंबून न राहता तपास सीबीआयकडे सोपविण्याची गरज आहे. दलितांनाही आत्मसन्मानाने जगता आले पाहिजे. आरोपींचा तपास लागला नाही तर पोलीस यंत्रणेवरील लोकांचा विश्वास उडेल. सीबीआयमार्फत तपास करण्याची सरकारने घोषणा केली नाही, तर वेळ पडल्यास एम.आय.एम. रस्त्यावर उतरेल. तसेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्येही तपासाची मागणी करणार आहे. हत्याकांडाबाबत राजकारण करण्यापेक्षा माणुसकीच्या दृष्टीने हा विषय महत्त्वाचा असल्याचे ओवेसी यांनी स्पष्ट केले.यावेळी माजी मंत्री गंगाधर गाडे, औरंगाबादचे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांची उपस्थिती होती. सकाळी आठ वाजताच त्यांनी मयत जाधव कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. (प्रतिनिधी)