शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्हा बँक भरतीची निपक्षपातीपणे चौकशी करा; राष्ट्रवादीसह, भाजप, सेनाही चौकशीवर नाराज, काँग्रेसकडून प्रतिक्रियाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 11:05 IST

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीप्रक्रियेबाबत जनतेच्या मनात शंका आहेत. त्यामुळे याबाबत निपक्षपातीपणे चौकशी होऊन सर्व शंकांचे निरसन होणे आवश्यक आहे, अशा प्रतिक्रिया राजकीय पक्षांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या आहेत. 

अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीप्रक्रियेबाबत जनतेच्या मनात शंका आहेत. त्यामुळे याबाबत निपक्षपातीपणे चौकशी होऊन सर्व शंकांचे निरसन होणे आवश्यक आहे, अशा प्रतिक्रिया राजकीय पक्षांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या आहेत. जिल्हा बँकेच्या भरतीतील अनियमिततेबाबत ‘लोकमत’ गत तीन वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. बँकेच्या संचालक मंडळाने याबाबत मौन धारण केले आहे. मात्र, जनतेतून याबाबत नाराजी वाढत असून अनेकांनी शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, माहिती अधिकार कार्यकर्ते शशिकांत चंगेडे, वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक अरुण जाधव यांनी सहकार सचिव व आयुक्तांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. विविध राजकीय पक्षांनीही ‘लोकमत’ला प्रतिक्रिया देताना भरतीच्या चौकशीची मागणी केली आहे. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी मात्र वरिष्ठांशी बोलून प्रतिक्रिया देऊ, असे सांगितले.

जिल्हा बँंक भरतीची निपक्षपातीपणे व योग्य एजन्सीकडून चौकशी होणे आवश्यक आहे. ही शेतक-यांची व नावाजलेली बँक आहे. तेथे काहीही गालबोट लागता कामा नये. तत्कालीन सहकार आयुक्त व इतर अधिकाºयांनी भरतीबाबत योग्य निर्णय घेतले आहेत का? ‘नायबर’ या संस्थेने भरतीचे नियम पाळले आहेत का? न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशी झाली आहे का? या सर्व बाबींची तपासणी व्हावी. भरतीत गैरव्यवहार झाला असेल तर तो समोर यायला हवा. राष्ट्रवादी काँग्रेस कधीही अशा गोष्टींचे समर्थन करणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितले. 

न्यायालयाच्या निर्णयानंतर भरतीतील संशयास्पद उत्तरपत्रिका खासगी एजन्सीकडून तपासून का घेतल्या ही बाब शंकास्पद आहे. फेरचौकशीत संशयित उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांच्या कार्बन कॉपींची तपासणी झाली नाही ही बाब ‘लोकमत’ने समोर आणली आहे. ही तपासणी का झाली नाही हेही आक्षेपार्ह आहे. त्यामुळे योग्य चौकशी होणे आवश्यक आहे. सहकार हा सामान्य जनतेच्या हितासाठी आहे. या संस्थांमध्ये गैरकारभार होत असेल तर ते चूक आहे. सहकारी संस्थांवर सामान्य कुटुंबातील लोक येत नाहीत, तोवर असे प्रकार थांबणार नाहीत, असे भाजपचे उतर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी सांगितले. 

जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीत गैरव्यवहार झाले असतील तर त्याची निश्चित चौकशी झाली पाहिजे़ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी़ वेळप्रसंगी सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला जाईल़, असे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBanking Sectorबँकिंग क्षेत्र