शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
4
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
5
‘’महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
6
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
7
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
8
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
9
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
10
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
11
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
12
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
13
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
14
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
15
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
17
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
18
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
19
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
20
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य

बदलीसाठी आंतरजिल्हा शिक्षकांचे उपोषण

By admin | Updated: May 30, 2016 23:53 IST

अहमदनगर : आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्या व्हाव्यात, यासाठी राज्य शिक्षक सेवा संघाच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांनी सहकुटुंब उपोषण सुरू केले आहे.

अहमदनगर : आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्या व्हाव्यात, यासाठी राज्य शिक्षक सेवा संघाच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांनी सहकुटुंब उपोषण सुरू केले आहे. आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांमध्ये बदलीपात्र शिक्षकांच्या यादीवरून मतभेद झाले असून दुसरीकडे या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिक्षक संघटना आणि पुढाऱ्यांमध्ये चढाओढ दिसून आली. आंतरजिल्हा बदलीने बदलून येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांचा आकडा २ हजारांच्या जवळपास पोहोचला आहे. यातील २०७ शिक्षकांना यापूर्वी शिक्षण विभागाने अटी-शर्तींवर जिल्ह्यात सामावून घेण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे. मात्र, साधारण सहा महिन्यानंतही या शिक्षकांना जिल्ह्यात घेतलेले नाही. यामुळे संतप्त झालेल्या या २०७ शिक्षकांनी कुटुंबासह जिल्हा परिषदेच्या आवारात उपोषण सुरू केले आहे. सोमवारी शिक्षण विभागाने आंदोलनकर्त्यांना पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आंतरजिल्हा शिक्षकांना जिल्ह्यात सामावून घेण्यात येईल, असे पत्र दिले आहे. मात्र, त्यानंतर शिक्षकांचे उपोषण सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होते. दरम्यान, दुपारनंतर आंदोलनकर्त्या शिक्षकांमध्ये मतमतांतरे निर्माण झाली. २०७ ना हरकत मिळालेल्या शिक्षकांना आधी त्यांची बदली व्हावी, असे वाटत आहे. तर उर्वरित शिक्षकांना पदोन्नती झाल्यावर रिक्त होणाऱ्या २०० ते २५० जागा आणि आधीच्या २०७ जागा अशा ४५० जागांवर एकदम शिक्षकांच्या बदल्या व्हाव्यात, असे वाटत आहे. यातून आंदोलनकर्त्यांमध्ये दोन गट पडले आहेत. एका गटाने बिनवडे यांना उपोषण मागे घेत असल्याचे आश्वासनही दिले होते. प्रत्यक्षात उपोषण सुरूच राहिले. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना गुरुमाउली मंडळ, सदिच्छा मंडळ, गुरुकुल मंडळ, ऐक्य मंडळ, पुरोगामी मंडळ, इब्टा मंडळ, पदवीधर शिक्षक महामंडळ यांनी पाठिंबा दिला. तसेच जि. प. सदस्य संभाजी दहातोंडे, नगरसेवक सुवेंद्र गांधी, श्रीगोंद्याचे राजेंद्र नागवडे, नगर पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले यांनी पाठिंबा दिला आहे. (प्रतिनिधी)