शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘कुकडी’चा कारभार सुधारण्याचे निर्देश : सरकारकडून कारखान्याची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 12:49 IST

श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजाबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आल्यामुळे प्रादेशिक साखर सहसंचालकांनी कारखान्याची चौकशी केली आहे.

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजाबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आल्यामुळे प्रादेशिक साखर सहसंचालकांनी कारखान्याची चौकशी केली आहे. या चौकशीअंती कारखान्याला निर्देश देण्यात आले असून तीन महिन्यात त्रुटी सुधारण्यास सांगण्यात आले आहे.घनश्याम शेलार व इतर सभासदांनी याबाबत गतवर्षी डिसेंबरमध्ये तक्रार केली होती. कारखान्याचा तोटा दिवसेंदिवस वाढत असून कारखान्याच्या २०१६-१७ चा अहवाल पाहिल्यानंतर काही आकडेवारीबद्दल आमच्या मनात शंका निर्माण झाल्या होत्या. याबाबत सर्वसाधारण सभेत विचारणा केली असता अध्यक्षांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप आमदार आहेत. पण कारखान्यात आम्हाला कुठलीही माहिती मिळत नाही अशी तक्रार करत एकूण दहा मुद्यांबाबत सरकारकडे तक्रार करण्यात आली आहे. कारखान्याने २०१६-१७ या वर्षात घसारा निधीची तरतूद केलेली नाही. या अहवाल वर्षात ऊस अ‍ॅडव्हान्स पोटी ९ कोटी २४ लाख रक्कम दिल्याचे दर्शविले आहे. राजकीय कार्यकर्त्यांना या पैशाचे वाटप झाले असून ही रक्कम वसूल होत नसल्याने थकबाकी वाढली आहे. ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार अ‍ॅडव्हान्सही ११ कोटी दर्शविला असून या रकमाही अनेक वर्षांपासून थकीत आहेत. या दोन्ही रकमांचा परिणाम कारखान्याच्या नफ्यावर होत आहे. अहवालात ९ कोटी २९ लाख रुपयांचे व्याज कारखान्यास येणे दाखविले आहे. मात्र, हे येणे कुठल्या बँकेकडून आहे याचा तपशील अहवालात नाही असे तक्रारीत म्हटले होते.या तक्रारीवरील चौकशीनंतर घसारा खर्च नफातोटा खाती खर्च दाखवावा, अ‍ॅडव्हान्सच्या रकमा वसुलीसाठी ठोस नियोजन करावे, ऊस तोडणी अ‍ॅडव्हान्सच्या वसुलीसाठी दावे दाखल करावेत, तसेच व्याजाबाबत कारखान्याने खर्च नोंदवून खरी वस्तुस्थिती सभासदांच्या निदर्शनास आणणे आवश्यक होते, असे निर्देश सहसंचालक संगीता डोंगरे यांनी दिले आहेत. कारखान्याने ३१ मार्च २०१७ पर्यंत ८९ कोटी रुपयांचे देणे दाखविले आहे. याबाबत कालबद्ध परतफेडीचा कार्यक्रम आखून अंमलबजावणी करावी. तसेच परतफेडीचा अहवाल सादर करावा, असेही म्हटले आहे. तसेच ऊस प्रोत्साहन खर्चाबाबत साखर आयुक्त कार्यालयाची मान्यता घेणेबाबत कार्यवाही करण्यास सांगितले आहे. कर्मचारी भरतीबाबतही तक्रार असल्याने याबाबत स्टाफिंग पॅटर्ननुसारच कार्यवाही करावी, असे डोंगरे यांनी निर्देशात म्हटले आहे.

कुकडी कारखान्याचा तोटा वाढला असून आमदार राहुल जगताप हे त्यांचे कार्यकर्ते पोसण्यासाठी अनियमितता करुन कारखान्याचे नुकसान करत आहेत. कोट्यवधीच्या रकमांचा हिशेबच नाही. हिशेबात अनियमितता असून, कारखाना कार्यस्थळावर माहिती मिळू दिली जात नाही. साखर सहसंचालकांनी कारवाई न करता केवळ निर्देश दिले आहेत. ही पळवाट आहे. त्यामुळे याबाबत सहकार मंत्र्यांकडे अपील दाखल केले आहे.- घनश्याम शेलार, शिवसेना नेते.कारखान्याबाबतच्या तक्रारीतील काही मुद्यांवर कारखाना व्यवस्थापनाला निर्देश देण्यात आले आहेत. त्यात सुधारणा करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. ती मुदत १४ नोव्हेंबरला संपली आहे. मात्र, कारखान्याकडून अहवाल आलेला नाही. अहवाल मागविला जाईल.- संगीता डोंगरे, प्रादेशिक सहसंचालक (साखर)

कारखान्याची चौकशी झाली आहे. आपण सध्या बाहेरगावी असून नगरला आल्यानंतर या प्रत्येक मुद्याबाबत सविस्तर माहिती देऊ, अशी प्रतिक्रिया यासंदर्भात राहुल जगताप यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा