शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

मूलभूत गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी धार्मिक मुद्दे पुढे केले जातात - बाळासाहेब थोरात 

By शेखर पानसरे | Updated: April 11, 2023 16:48 IST

देव हा शेतकऱ्यांमध्ये आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

संगमनेर : अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात असताना त्यांना सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळाली पाहिजे. मात्र, मूलभूत गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहेत. देव हा शेतकऱ्यांमध्ये आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी (दि. ११) तालुक्याच्या पश्चिम भागातील सावरचोळ, मेंगाळवाडी, निमगाव खुर्द, निमगाव बुद्रूक, पेमगिरी, नांदुरी दुमाला आदी गावांमध्ये जाऊन आमदार थोरात यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. 

नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या. त्यांच्यासमवेत एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा, कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय फटांगरे, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, पेमगिरी गावचे माजी सरपंच सोमनाथ गोडसे, संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरात